शालेय स्पर्धा म्हणजे सुप्त गुणांना मार्ग दाखविणारे व्यासपीठ, ऍड.बाबासाहेब वासाडे

38

राजुरा(संतोष कुंदोजवार)-
शाळा स्तरावर होणाऱ्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा भविष्यातील उकृष्ठ खेळाडु तथा कलाकार तयार करणारे व्यासपीठ आहे,असे प्रतिपादन एडव्होकेट बाबासाहेब वासाडे यांनी केले
गोंडपीपरी तालुक्यातील कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय लाठी येथे शालेय क्रीडा व सांस्कृतिक स्नेहसम्मेलन पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एडव्होकेट बाबासाहेब वासाडे होते डाँ. देवानंद गुरु यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी उपसरपंच साईनाथ कोडापे,ठाणेदार सुखदेव शहारे,शामराव शेडमाके,सुमनताई गेडाम,राजेंद्र खाडे आदी मान्यवर उपस्थित होते
प्रास्तविक मुख्याध्यापिका सुधाताई वासाडे यांनी केले संचालन प्राध्यापक अरुण नक्षीने यांनी केले तर सहायक शिक्षक सतीश मेश्राम यांनी आभार मानले
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यानी विविधरंगी नृत्यु,नाटिका, नकला सादर करून उपस्थित प्रेक्षकाची मने जिंकली यावेळी संतोष कुंदोजवार यांनी सुरेश खेडेकर यांचे मदतीने केलेली नक्कल कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्राध्यापक वामन मोरे, सहायक शिक्षक देवानंद ढूमणे,चंद्रकांत आसुटकर,शिक्षिका लक्ष्मी कडते,शिक्षकेत्तर कर्मचारी अंकुश वनमाळी,किशोर देवाडकर आदींसह शाळा समिती सदस्य,विद्यार्थ्यानी सहकार्य केले