केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धेत अंतरगाव शाळेतील पाच विद्यार्थ्यांचे सुयश..

258

 

अंतरगाव :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेलगाव येथे मंगळवार रोजी घेण्यात आलेल्या केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अंतरगाव शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकविण्यात यश आले यात १) कु. श्रवण खुशाल नागोसे हिने कथाकथन मध्ये २) प्रेम मोतीराम ढाक याने वाद विवाद मध्ये ३) गौरव मुरलीधर बारापात्रे यांनी एकपात्री मध्ये ४) मंथन प्रफुल गज्जलवार याने स्वयंस्फूर्त व लेखन तसेच ५) चैतन्य विजय जनगणवार याने चित्रकला मध्ये द्वितीय क्रमांक पटकवलाय अशा पाच विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावित अंतरगाव शाळेचे नाव उंचावल्याबद्दल शाळेतील मुख्याध्यापक लोमेश भंडारे, गौतम भैसारे, प्रीती साखरकर ,हर्षा बोरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राकेश तेलकापलीवार तसेच पालकानी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.