युवकांनी खेळाच्या माध्यमातून स्वतःचे शारीरिक स्वास्थ जपावे – कु.शिवानीताई वडेट्टीवार

307

 

एस न्यूज नेटवर्क :- 

सावली( व्याहाड बुज):-क्रांतीज्योती क्रिकेट क्लब व्याहाड बुज. तर्फे विजयभाऊ वडेट्टीवार फॅन्स क्लब व्याहाड बूज.च्या माध्यमातून मौजा.व्याहाड बूज.येथे भव्य टेनिस बॉल अंडर आर्म क्रिकेट स्पर्धाचे आयोजन दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेले होते, या टेनिस बॉल अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक हे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते मा. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे ३३हजार रुपये असे पारितोषिक होते तर द्वितीय पुरस्कार हे २७ हजार रुपयाचे मा. डॉ.नामदेवराव किरसान महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,मा.रोहितभाऊ बोम्मावार अध्यक्ष अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड चंद्रपूर ,मा.निखिलभाऊ सुरमवार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली,मा.नितीनभाऊ दुवावार काँग्रेस कार्यकर्ते सावली यांच्यातर्फे होते तर तृतीय पुरस्कार १५००० रुपयाचे काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष मा.विजयभाऊ मुत्यलवार सावली , तालुका युवा काँग्रेस अध्यक्ष मा.किशोरभाऊ कारडे ,माजी पंचायत समिती सभापती मा.राकेशभाऊ गड्डमवार,किसान नगर येथील काँग्रेस कार्यकर्ते मा.संजयभाऊ मजोके ,व्याहाड बूज.येथील काँग्रेस कार्यकर्ते मा.दीपकभाऊ गद्देवार वाघोली बुटी येथील माजी सरपंच मा.टिकाराम रोहनकर यांच्यातर्फे होते,या सामन्यामध्ये प्रथम विजेत्या प्राप्त टीमला प्रथम चषक हे मा.आशिषभाऊ मनबत्तुलवार माजी सरपंच उपरी,मा.दिवाकरभाऊ काचीनवार,मा.आशिष भाऊ पून्यपवार,मा.महेशभाऊ गड्डमवार यांच्या हस्ते आहे, द्वितीय चषक हे मा. संगपाल भगत सर मुख्याध्यापक व्याहाड बूज.तथा रोशन गुरनुले सोनापूर यांच्यातर्फे होते,तर तृतीय चषक डॉ.अमित बाटवे,धनराज गुरनुले ग्रामपंचायत सदस्य व्याहाड बूज. यांच्यातर्फे होते.

या क्रिकेट सामन्याचे उद्घाटक म्हणून शिवानीताई वडेट्टीवार युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य , अध्यक्ष म्हणून सावली तालुका काँग्रेस कमिटीचे मा.नितीन गोहने तर दीपप्रज्वलन माजी सरपंच वंदनाताई गुरनुले यांचे हस्ते झाले,विशेष अतिथी म्हणून लाभलेले सावली तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोरभाऊ कारडे,माजी सभापती राकेशभाऊ गड्डमवार, काँग्रेस कार्यकर्ते संजय मजोके, दीपक भाऊ गद्देवार, वाघोलीचे माजी सरपंच टिकाराम रोहनकर , अनिलभाऊ गुरनुले , आशिषभाऊ मनबत्तूलवार उपसरपंच उपरी,डोमाजी शेंडे अध्यक्ष काँग्रेस कमिटी सोनापूर , दिलीपभाऊ लटारे उपसरपंच लोंढोली,ज्ञानदेव बारसागडे माजी उपसरपंच पेडगाव,अरुण भाऊ येरमलवार ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते पेडगाव , प्रवीणभाऊ गेडाम पत्रकार उपरी ,चेतनभाऊ मोटघरे ,सचिन इंगलवार काँग्रेस कार्यकर्ते ,पितांबर वासेकर माजी सरपंच व्याहाड बूज. जयंतभाऊ संगीडवार जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते , प्रवीणभाऊ सातपुते काँग्रेस कार्यकर्ते , संजयभाऊ गुरनुले माळी समाज अध्यक्ष व्याहाड बूज.किशोरभाऊ लेनगुरे माजी अध्यक्ष तथा अन्य मान्यवर उपस्थित होते.

जातीपातीच्या आणि धर्माच्या भिंती ओलांडून क्रीडा क्षेत्र खेळाडूंना एकत्र आणत असते.एक गोष्ट कायम लक्षात घेतली पाहिजे की श्रध्दा बाळगणारे कधीच धर्माचं राजकारण करत नाही. जे करतात ते धार्मिक असूच शकत नाही. धर्म त्यांना केवळ राजकारणासाठी वापरायचा असतो. हे आजच्या युवा पिढीने समजून घेणे गरजेचे आहे,असे शिवानीताई वडेट्टीवार यांनी उदघाटन प्रसंगी म्हटले आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिलभाऊ गुरनुले पत्रकार, संचालन प्रवीणभाऊ गेडाम पत्रकार उपरी ,आभार प्रदर्शन रोशन गुरनुले पत्रकार सोनापूर यांनी केले.