खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात विश्वास ठेऊन सावली येथे युवकांचा भाजपामध्ये पक्ष प्रवेश

458

 

सावली येथे आज अनेक युवकवर्गानी भारतीय जनता पार्टी वर विश्वास ठेऊन खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात भगवा भाजपाचा दुपट्टा टाकुन अनेक युवकांनी भाजपात पक्षप्रवेश केला.

निखिल शेंडे, भास्कर शेंडे, लक्ष्मण प्रधाने,संदिप वाढई,भूषण प्रधाने, गणेश प्रधाने, अंकुश गुरूनुले,कुलभूषण मोहुरले, हरिदास वाढई,अमर शेंडे, अभिषेक प्रधाने इत्यादी युवकांनी भाजपात पक्ष प्रवेश केला.

भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, भाजप महिला जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेविका नीलम सुरमवार, नगरसेविका शारदा गुरुनुले, भाजपा शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर ज्येष्ठ नेते प्रकाश खजांची ,प्रकाश गड्डमवार,युवा नेते निखिल सुरमवार, अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष इमरान शेख, रुकसान शेख, आनंद खजांची, सोशल मीडिया अध्यक्ष मयूर गुरुनुले या पदाधिकारी सह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.