चारित्र्य हा पत्रकार, शिक्षकांमधील समान दुवा – सुनील कुहीकर

55

 

 

सावली (सौरव गोहने )
बातमी विपरीत असते. त्यामध्ये आजकाल रित सांगितले जात नाही. शुद्ध चारित्र्य असणे पत्रकार आणि शिक्षक यामधील समान दुवा आहे, म्हणून पत्रकार व शिक्षक यांचे अतूट असे नाते आहे, शिक्षक आणि पत्रकार सतत लोकांसमोर उभे असतात. समाजाला दिशा देतात. खऱ्या अर्थाने पत्रकारितेचा पाया शिक्षकांनीच रोवला असे प्रतिपादन पत्रकार दिन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहीकर यांनी केले.

आद्य पत्रकार तथा दर्पणचे संपादक बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृति जागवण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया मीडिया चंद्रपूर जिल्हा व सावली तालुक्याच्या वतीने ०९ जानेवारी रोजी स्वर्गिय वामनराव पाटील गड्डमवार किसान सांस्कृतिक भवनामध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली.

पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य संघटक सुनील कुहिकर हे होते. सोहळ्याचे उद्घाटन सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून नगर पंचायत सावलीच्या नगराध्यक्ष लताताई लाकडे, पोलीस स्टेशन सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, सावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरज बोम्मावार, तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल गुरनुले, भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे सचिव
राजाबाळ पाटील संगिडवार, डाँ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटी सावलीचे अध्यक्ष कांतीलाल बोरकर, प्रा. रविंद्र डोर्लीकर, लोकशाही वार्ताचे जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र चोरडीया आदी उपस्थित होते.

आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेला मालार्पण व दिप प्रज्वलन करण्यात आले. डाँ. शेखर प्यारमवार यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. या विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक,.ठाणेदार आशिष बोरकर, तहसिलदार परीक्षित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार म्हणून तेजराम कापगते, डॉ. षडाकांत कवठे, गोपाल रायपुरे यांचेसह उदयोन्मुख उद्योजक चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट सोसायटीचे अध्यक्ष रोहित बोम्मावार, युवा उद्योजक कवींद्र रोहनकर यांचा यावेळी गौरवचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. तालुक्यातील व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष, विश्वशांती विद्यालय सावलीचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार, रमाबाई आंबेडकर विद्यालय सावलीचे मुख्याध्यापक नानाजी शेंडे, शरदचंद्र पवार विद्यालय व्याहाडचे मुख्याध्यापक प्रशांत गाडेवार, विकास विद्यालय विहीरगांवचे मुख्याध्यापक कल्पना गराटे, नवभारत विद्यालय व्याहाडचे मुख्याध्यापक संघपाल भगत ,जे.के. पाल विद्यालय व्याहाडच्या मुख्याध्यापीका ज्योती पाल व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला आणि विविध पत्रकारांना शैक्षणिक साहीत्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी मागील तीन वर्षापासून सुरू असलेल्या संघटनेचे कार्य आणि भविष्यात राबविण्यात येणाऱ्या योजना याबद्दल सविस्तर माहिती प्रास्ताविकेतून दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विजय गायकवाड यांनी केले तर आभार गिरीश चिमूरकर यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जिल्हा पदाधिकारी व व्हॉईस ऑफ मीडिया संघ सावलीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.