राजुरा-हैद्राबाद महामार्गातील त्या पेट्रोल पम्पावरील दरोड्यातील आरोपींना 12 तासात केली अटक *चंद्रपूर पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी*

209

 


राजुरा(प्रतिनिधी)-

दिनांक ०६/०१/२०२४ रोजी राजुरा ते हैद्राबाद या महामार्गातील साई पेट्रोलपम्पवर रात्री शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या आरोपींना अवघ्या 12 तासात अटक करण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आले असून आरोपी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे पोलिसांच्या या कामगिरीचे अभिनंदन केले जात आहे

फिर्यादी नामे अमरसिंग भिसन जाधव, वय ३६
वर्ष, रा. बापूनगर, ता. राजुरा, जि. चंद्रपूर यांनी पोलीस स्टेशन विरुर येथे तोंडी रिपोर्ट दिला की, फिर्यादी व रविंद्र धुर्वे हे राजुरा ते आसिफाबाद रोडवरील साई पेट्रोलपंपवर
पेट्रोल भरण्याचे कामावर असतांना दिनांक ०६/०१/२०२४ चे पहाटे ०३:०० वा.
सुमारास दोघेही ऑफिसला लॉक लावून पेट्रोलपंपचे मशीनजवळ गादी टाकून झोपले
असतांना गुन्ह्यातील अनोळखी पाच इसमांनी हातात बंदूक व कोयता घेवून फिर्यादी व
साक्षीदार यांना बंदुक व कायत्याचा धाक दाखवून ऑफिसचे लॉक उघडण्यास सांगूनऑफिसचे आत असलेले लोखंडी कपाटातील नगदी रोख १,९३,८५३/- रुपये घेवूनतसेच ऑफिसमधील डिव्हिआर व एलईडीची तोडफोड करुन फिर्यादी व साक्षीदार यांचे मोबाईल व मोटार सायकल घेवून थोड्या अंतरापर्यंत जावून मोटार सायकल व मोबाईल टाकून पळून गेले. त्यावरुन पोलीस स्टेशन विरुर, जि. चंद्रपूर येथे अपराध क्रमांक ०८/२०२४, कलम ३९५, ३९८ भादंवि अन्वये नोंद करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासात चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा व इतर पोलीस स्टेशन मधून वेगवेगळे तपास पथक तयार करुन त्यांचेकडून गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून गुन्ह्यातील नामे १) सुरेश शेरकुरे, वय ३१ वर्ष, पारधी, २)दिपक शंकर देवगडे, वय २२ वर्ष, जतः पारधी, ३) नंदकिशोर रविंद्र देवगडे, वय १९.वर्ष, जातः पारधी, तीन रा. पारधीगुडा (लक्कडकोट), ता. राजुरा, जि. चंद्रपुर, ४) महेशबाबू देवगडे, वय २२ वर्ष, जातः पारधी, रा. धोपटाळा, ता. कोरपना, जि. चंद्रपुर व ५)अभिषेक दत्तू काळे, वय २० वर्ष, जतः पारधी, रा. खैरगाव, ता. कोरपना, जि. चंद्रपुर हे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीतांकडून गुन्ह्यात चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी रुपये ५६०००/- रुपये हस्तगत करण्यात आलेले आहे.
सदर कामगीरी हि जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी,अप्पर पोलीसअधीक्षक रीना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरक्षक महेश कोंडावार,व त्यांचे पथक, पोलिस निरक्षक योगेश्वर पारधी, सहायक पोलिस निरक्षक धर्मेंद्र जोशी, सहायक पोलिस निरक्षक संतोष वाकडे पोलीस स्टेशन राजुरा व त्यांचे पथक, कोरपणाचे पोलिस निरक्षक. संदिप एकाडे, व पथक, कोठारीचे सहायक पोलिस निरक्षक विकास गायकवाड, व त्यांचे पथक, उमरी पोतदार चे सहायक पोलिस निरक्षक किशोर शेरकी, व पथक यांनी केलेली असून पुढील तपास सहायक पोलिस निरक्षक जयप्रकाश निर्मल, पोलीस स्टेशन विरुर हे करीत आहे.