बस ट्रकची धडक,मोठा अनर्थ टळला *बामणी जवळील घटना*

209

राजुरा(प्रतिनिधी)-

आज सकाळी चंद्रपूर वरून आशिफाबाद ला जाणाऱ्या तेलंगणा राज्य बसला बल्लारपूर जवळील गुरुनानक महाविद्यालय समोर ट्रक ची धडक बसली बस चालकाच्या प्रसागवधानाने बस मधील प्रवासी सुदैवाने वाचले ही घटना आज दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली
चंद्रपूर वरून ही बस आसिफबादला जाण्यासाठी निघाली मार्गातील बलारपूर ते बामणी दरम्यान गुरुनानक महाविद्यालय समोरील चौकात एका ट्रक चालकाने सरळ येणाऱ्या बसकडे दुर्लक्ष करीत ट्रक वळविला इतक्यात बस समोर आली आणि ट्रकची बसला धडक बसली आणि बस थोडी घासली गेली आणि प्रवाश्याचा एकच गोंधळ झाला बस चालकाच्या प्रसावधानाने मोठा अनर्थ टळला असे असतानाही ट्रक चालक मात्र बस चालकाशी वाद घालीत असल्याने बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती असे प्रवाश्यानी सांगितले
आज शनिवार असल्याने या बसमध्ये बरेच शिक्षक ही प्रवास करीत होते जीव कसाबसा वाचले म्हणून घडलेला प्रकार सांगीत होते