समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा- डेकेश्वर पर्वते यांचे प्रतिपादन

26

 

करगाव येथे सावित्रीमाई फुले जयंती साजरी

संविधानाच्या कलम ५१ए-एच् नूसार समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती, मानवतावाद निर्माण करणे हे आपले मूलभूत कर्तव्ये आहेत. त्यानूसार प्रत्येकाने शोधक वृत्ती बाळगली पाहिजे. त्याकरिता समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती, तालुका शाखा सिंदेवाहीचे संघटक डेकेश्वर पर्वते यांनी, सार्वजनिक माळी समाज, करगांव, तालुका सावलीच्या वतीने, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती महोत्सवा निमित्त आयोजित वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर समितीची भूमिका व वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगताना ते बोलत होते.

 

अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा सिंदेवाहीचे सचिव मोरेश्वर गौरकार यांनी जादूटोणा विरोधी कायदा अनुसूचितील१२कलमासह समजावून सांगितला. अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चंद्रपूर जिल्हा सहसचिव अनिल लोनबले यांनी चमत्कारा मागील विज्ञान प्रयोगासह समाजावून सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनार्धन चौधरी यांनी, सूत्रसंचालन प्रमोद चौधरी यांनी, तर आभारप्रदर्शन विकास वाढई यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील सर्व पुरुष,महिला तथा विद्यार्थी मित्र उपस्थित होते.