राजुऱ्यात रंगणार आमदार चषक कबड्डीची चुरस : उद्घाटनाला सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी ची हजेरी.

43

राजुरा(प्रतिनिधी)-
आमदार सुभाषभाऊ धोटे मित्र मंडळ, राजुरा क्लब, सेवा कलश फाउंडेशन राजुरा द्वारा आयोजित विदर्भ स्तरिय आमदार चषक कबड्डी स्पर्धांचा थरार दिनांक ५ ते ७ जानेवारी २०२४ रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, राजुरा च्या पटांगणावर पहायला मिळणार आहे.

  •              दिनाक ५ जानेवारी ला ४ वाजता आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी व इतर अतिथींच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार असून या स्पर्धेत पुरुष गटात प्रथम पुरस्कार ७१ हजार रू. रोख व चषक, द्वितीय पुरस्कार ५१ हजार रु. रोख व चषक, महिला गटात प्रथम पुरस्कार ५१ हजार रु. रोख व चषक, द्वितीय पुरस्कार ३१ हजार रु. रोख व चषक तसेच विविध वैयक्तिक पुरस्कार ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत नागपूर, काटोल, मोहाडी, अजनी, अकोला, उमरेड, हिंगणघाट, वाशीम, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, पुलगाव, वर्धा, वरोरा, नागरी, आर्वी, चंद्रपूर, गडचिरोली, बल्लारपूर येथील पुरुष गटातील ४० आणि महिला गटातील २० संघांचा समावेश असणार आहे. अशी माहिती आमदार सुभाष धोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    राजुरा शहरात होणाऱ्या विदर्भ स्तरिय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने राजुरा आणि परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार सुभाष धोटे मित्र मंडळ, राजुरा क्लब, सेवा कलश फाउंडेशन च्या वतीने करण्यात येत आहे. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, अशोकराव देशपांडे, जिल्हा कबड्डी संघाचे अध्यक्ष सुभाषसिंह गौर, सचिव प्रशांत करडभाजने, कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू कुणाल चहारे, सेवा कलश फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे, आदी उपस्थित होते.