राजुरा पत्रकार असोसिएशनची नवीन कार्यकारणी गठित;*

45

 

राजुरा (प्रतिनिधी):
राजुरा पत्रकार असोसिएशन राजुराच्या कार्यकारणीचा तीन वर्षाचा कार्यकाल संपल्याने नविन कार्यकारणीची निवड करण्यासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली.

नविन कार्यकारणीची निवड करण्यासाठी नुकतीच शासकीय विश्रामगृह राजुरा येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे बिनविरोध निवडणूक घेण्यात आली यात अध्यक्षपदासाठी श्रीकृष्ण गोरे यांचे सर्वानुमते नाव समोर आल्याने त्यांची एकमताने निवड करण्यात आली. सचिव एजाज अहमद, कार्याध्यक्ष मंगेश बोरकुटे, उपाध्यक्ष संतोष कुंदोजवार, प्रा. प्रफुल शेंडे, कोषाध्यक्ष सय्यद जाकीर, सहसचिव साहील सोळंके तर कार्यकारणी सदस्य म्हणून वसंत पोटे, मनोज आत्राम, फारुख शेख, शहनवाज कुरेशी, अमीत जयपूरकर, सागर भटपल्लीवार, उमेश मारशेट्टीवार, मंगेश श्रीराम, बंडू वनकर, प्रकाश काळे, प्रेस फोटोग्राफर अविनाश दोरखंडे यांची निवड करण्यात आली. नविन कार्यकारणीच्या निवडीबद्दल शहरातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले.