उद्यापासून सावलीत सद्भावना क्रिकेट चषक चे आयोजन सावली पोलिस स्टेशन चा उपक्रम

314

 

सावली तालुक्यातील विविध विभागाचे 16 चमू खेळणार

सावली(प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस स्टेशन सावलीच्या वतीने सावली येथील योगी नारायण बाबा क्रीडा संकुलावर दिनांक 4 जानेवारीला सकाळी 8:30 वाजता सद्भावना क्रिकेट कप या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

 

या निमित्ताने सावली येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय, पोलीस स्टेशन सावली, वनविभाग सावली,पाटबंधारे विभाग सावली, तालुका पत्रकार संघ सावली ,तहसील कार्यालय सावली, ग्रामीण रुग्णालय सावली, नगरपंचायत सावली, पंचायत समिती सावली, व्यापारी असोसिएशन सावली ,सरपंच संघटना ,आपदा टीम यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने भरवले जाणार आहे.

 

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेसी व अध्यक्ष उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम हे त्यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकाअर्जुन इंगळे , प्रथम वर्ग न्याय दंडअधिकारी अक्षय जगताप,सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील, नगरपंचायत नगराध्यक्ष लता लाकडे, मुख्याधिकारी राहुल कंकाळ, पाथरी पोलीस स्टेशन ठाणेदार मंगेश मोहोळ,सावली वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.ए. राजूरकर , असोलामेंढा प्रकल्प सहाय्यक अभियंता मनोज नाईक, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय डॉक्टर बंडू रामटेके , गटविकास अधिकारी पंचायत समिती मधुकर वासनिक ,,ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल गुरुनूले ,सावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरज बोम्मावार,व्होईस ऑफ मिडिया पत्रकार संघ अध्यक्ष प्रवीण झोडे ,व्यापारी असोसिएशन सावली अध्यक्ष प्रवीण सुरमवार,आपदा वन्यजीव टायगर ग्रुप चे अध्यक्ष विवेक लेन्गुरे ,सावली तालुका सरपंच संघटना अध्यक्ष पुरुषोत्तम चुदरी हे उपस्थित राहणार असून या दिवसभरच्या क्रिकेट सामन्यांचा समस्त जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी केले आहे.