मालपीरंजी जवळ अपघातात गोसेखुर्दचा कंत्राटी कर्मचारी ठार

1378

 

सावली ता. प्र.

सावली तालुक्यातील सावली ते बोथली या मार्गावरील मालपिरंजीच्या समोरील रस्त्यावर एका झुडपात दुचाकी व एक युवक पडल्याची माहिती काही जणांनी सावली पोलिसांना दिली त्यावरून सावली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सदर त्या मृतकाची तपासणी केल्यावर तो युवक मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था व गोसेखुर्द प्रकल्पात पाणी वापर संस्था सक्षमीकरणाचे ब्रम्हपूरी येथे गटस्तरीय समन्वयक म्हणून काम करीत असलेले बंडु उबाळे वय 30 वर्ष असे नाव माहिती झाल्याने गोसेखुर्द विभागाला कळविण्यात आले.मृतक बंडू उभाळे हा शेतकऱ्यांना पाणी वापर संदर्भात मार्गदर्शक करीत होता. त्याच्या अपघाताच्या मृत्यूची बातमी ने अनेक शेतकऱ्यांनी दुःख व्यक्त केले.

अपघाता स्थळावर गाडी ही कुठून कुठे जात होती व अपघात कसा झाला या संदर्भात कसलीही माहिती नाही मात्र अपघात हा अंदाजे रात्रौ च्या सुमारास झाला असावा असा संशय ही व्यक्त केल्या जात आहे. आणि झुडुपात असल्याने तो कुणाच्या ही निदर्शनास आलेला नव्हता.MH 28 NB 8871 होंडा शाईन या कंपनीची गाडी त्या घटनास्थळी आढळून आलेली आहे .

सध्या या मार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे या प्रकरणांचा तपास सावली पोलीस करीत आहे.