बुध्द मुर्ती विटंबनेचा सावलीमध्ये निषेध

330


सावली प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्हयातील भद्रावती येथील ऐतिहासिक विजासन लेणीवरील बुध्द मुर्तीची अज्ञात व्यक्तीकडुन विटंबना झाल्याची घटना 1 जानेवारी रोजी उघडकीस आली याघटनेचा निषेध नोंदवून अज्ञात आरोपीस त्वरीत अटक करुन शिक्षा ठोठावण्यात यावी याकरीता सावली तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीने सावलीचे तहसिलदार यांचे मार्फतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
ऐतिहासिक विजासन लेणी ही पुरातन काळापासुन भद्रावती येथे स्थित असुन बौध्द बांधवांचे श्रध्दास्थान आहे. या ठिकाणी अनेक बौध्द बांधव पुजा अर्चना करुन आपली श्रध्दा व्यक्त करीत असतात. परंतु काही समाजकंटकांकडुन बुध्द मुर्तीची तोडफोड करुन विटंबना केल्याने समस्त बौध्द बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. असे प्रकार वारंवार घडत आहेत यावर प्रशासनाने तोडगा काढून यापुढे अशा घटना घडणार नाही या करीता उपाययोजना करुन विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला तात्काळ अटक करुन शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली. अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे संपुर्ण जिल्हाभर आंदोलन उभारण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास माहोरकर, जिल्हा संघटीका उल्काताई गेडाम, तालुका अध्यक्ष भास्कर आभारे, सावली शहर अध्यक्ष रोशन बोरकर, शहर अध्यक्ष महिला वेणुताई बोरकर, शहर उपाध्यक्ष ललीताबाई मेश्राम, किरण गेडाम, जिल्हा युवा उपाध्यक्ष अनिकेत गोडबोले, जेष्ठ कार्यकर्ता विलास बोरकर, बलवंत दुर्गे, विना गडकरी, राणी मोटघरे, वैशाली गेडाम, बबीता दुधे, कांचन रामटेके, ज्योती चुनारकर, प्रज्ञा गणविर, ज्योत्सना दुधे, रावळे ताई आदि कार्यकर्ते उपस्थित होते.