स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन. – चंद्रपूर जिल्ह्यातील शाळेतील स्काऊट -गाईड ना सहभागी होण्याचे आवाहन.

40

 

राजुरा (प्रतिनिधी)-

चंद्रपूर भारत स्काऊट्स आणी गाईड्स जिल्हा कार्यालयाच्या वतीने दि. 29 ते 31जानेवारी 2024 या कालावधीत संध्या विहार समिती पदमापूर जिल्हा चंद्रपूर येथे स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यामधे प्रथमोपचार, संचलन (मार्चपास ), ग्यझेट व तंबू, निरीक्षण, शारीरिक कवायती व मानवी मनोरे, शेकोटी कार्यक्रम, शोभायात्रा, साहसी खेळ इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे मेळाव्यात सहभागी नावाची यादी दि. 5 जानेवारी 2024 पर्यंत चंद्रपूर भारत स्काऊट्स आणी गाईड्स जिल्हा कार्यालयाकडे जमा करण्यात यावी सदर जिल्हा मेलाव्यामधे चंद्रपूर जिल्ह्यातील शाळानी आपल्या शाळेतील जास्तीत जास्त स्काऊट गाईड यांना पाठवावे असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथ.) तथा जिल्हा मुख्य आयुक्त चंद्रपूर भारत स्काऊट्स आणी गाईड्स शिक्षणाधिकारी (माध्य.) तथा जिल्हा आयुक्त (गाईड ) श्रीमती कल्पणा चव्हाण, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) तथा जिल्हा चिटणीस श्रीमती निकिता ठाकरे व जिल्हा संघटक चंद्रकांत भगत यांनी केले आहे.