मालपीरंजी जवळ अपघात !;दुचाकी स्वराचा मृत्यू

2125

 

सावली तालुक्यातील सावली ते बोथली या मार्गावरील मालपिरंजीच्या समोरील रस्त्यावर एका झुडपात दुचाकी व एक युवक पडल्याची माहिती काही जणांना सावली पोलिसांना दिली त्यावरून सावली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सदर त्या युवकाला सावलीतील ग्राम रुग्णालयात पाठवलेले आहे.

मात्र त्याचा घटनास्थळी च मृत्यु झाल्याचे दिसले. सदर गाडी ही कुठून कुठे जात होती व अपघात कसा झाला या संदर्भात कसलीही माहिती नाही मात्र अपघात हा अंदाजे रात्रौ च्या सुमारास झाला असावा असा संशय ही व्यक्त केल्या जात आहे. आणि झुडुपात असल्याने तो कुणाच्या ही निदर्शनास आलेला नव्हता.MH 28 NB 8871 होंडा शाईन या कंपनीची गाडी त्या घटनास्थळी आढळून आलेली आहे .

सध्या या मार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे या प्रकरणांचा तपास सावली पोलीस करीत आहे.