ऑनलाइन पोर्टल वर नोंदणी साठी 15 जानेवारी पर्यँत मुदत

519

 

सावली – खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता 31 डिसेंबर 2023 ही मुदत होती परंतु पुरेशी नोंदणी न झाल्याने व 31 तारखेपर्यंत नोंदणी होऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांनी मुदतवाढीची मागणी केली त्यानुसार पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दिनांक 15 जानेवारी, 2024 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.