सविता बनली दुय्यम निबंधक@राज्यातून ओबीसी महिला गटात मिळाले स्थान

87

 

मूल ता. 22 : अथक प्रयत्न परिश्रम केल्यास यश मिळतेच याचे ज्वंलत उदाहरण म्हणजे येथील सौ. सविता अमर भोयर होय सविताने लोकसेवा आयोगाने घेतलेल्या दुय्यम निबंधक वर्ग एकच्या परीक्षेत राज्यातून ओबीसी महिला गटात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

मूल येथील प्रतिष्ठित काॅन्ट्रक्टर ओम चैतन्यप्रभू कनस्ट्रक्शन कंपनी चे अध्यक्ष प्रभाकर भोयर व माजी नगराध्यक्ष प्रा. रत्नमाला भोयर यांची सून असून स्व. राजू भोयर यांचा मूलगा अमर भोयर यांच्याशी लग्नगाठ बांधली गेली आहे. गोंडपिपरी येथील मोरेश्वर सुरकर यांची सविता ही मूलगी असून ते मूळचे घडोली येथील रहिवासी आहेत. अतिशय परिश्रमाने त्यांनी गोडपिपरीत उद्योजक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे.

सविता ने आदिवासी बहुल तालूक्यातील गोंडपिपरी येथील गजानन महाराज महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले असून . पुढे बीआयटी बल्लारशा येथून एमबीएचे शिक्षण घेतले .त्यानंतर ती स्पर्धा परीक्षा कडे वळली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लिपिक परीक्षेत सविताने यश मिळविले. सविता सध्या मुंबईत मंत्रालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. ( गुरुवार ता. 21) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2022 रोजी घेतलेल्या दुय्यम निबंधक वर्ग एकच्या मुख्य परीक्षेचा निकाल लागला त्यात सविताने बाजी मारली. सविता पूर्ण राज्यातून ओबीसी महिला गटातून प्रथम आली आहे. सविताने स्पर्धा परीक्षेत वर्ग एकच्या पदावर आपले नाव कोरल्याचे समजताच भोयर तसेच सुरकर कुटुंबीयांनी सविताचे अभिनंदन करीत आनंद साजरा केला.