अवैध कोंबडा जुगार अड्ड्यावर सावली पोलिसांची धाड

1538

 

*दोन लाखाच्या वर मुद्देमाल जप्त*

सावली:-
पोलीस स्टेशन सावली अंतर्गत सामदा गावाच्या शेतशिवरात कोंबडा झुंज लाऊन जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती दिनांक २५/१२/२३ रोजी सकाळी १० वाजता दरम्यान मिळाली असता सापळा रचून सदरची कारवाई करण्यात आली. यामध्ये सावली पोलिसांनी आरोपी ६ ताब्यात घेतले.

सावली तालुक्यातील सामदा गावात अवैध कोंबडा जुगाड़ सुरु असल्याची गुप्त माहिती सावली पोलिसांना मिळताच पोलिसांनी धाड़ टाकली असता त्या हल्लाबोल झाल्याने पड़ापड़ झाली त्यात 5 आरोपी ताब्यात सापडले असता आरोपींकडून ४ मोटर सायकल सहित अंग झडतीत नगदी तसेच कोंबडे व कात्या मिळून असा *एकूण किंमत २,०२२८०/- रु* चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
व आरोपी १) किशोर शंकर चलाख रा सोनापुर २) बालाजी कृष्णा मेश्राम रा सोनापुर ३) अशोक गुरुदास गेडाम रा व्याहाड बु ४) अतुल शामराव शेंडे रा सामदा ५) महेश मारुती गेडाम रा व्याहाड बू ६) नितेश सदाशिव भुरसे रा सोनापुर यांचेवर जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांचे आदेशान्वये ठाणेदार आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनखाली पोलीस उपनीरिक्षक एकनाथ राठोड, सहाय्यक फौजदार चरण मडावी,हेड कॉन्स्टेबल संजय शुक्ला,दिलीप मोहुर्ले,कॉन्स्टेबल चंद्रशेखर गंपलवार,धीरज पिदुरकर,अशोक मडावी यांनी केली.