१३ वर्षांनंतर जुने मित्र आले एका छताखाली

326

 

भगवंतराव शिक्षण महाविदयालय अहेरी सत्र २०१० मध्ये बी.एड पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या वर्ग मित्रांचा १३ वर्षांनंतर स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात आला.

 

सध्या धकाधकीच्या जीवनात आयुष्याचं अनेक स्वप्नपूर्ती करण्यास प्रत्येक व्यक्तीला मोठ्या तारेवरची कसरत करावी लागते. त्यातीलच एक भाग म्हणजे बी एड पदविका अभ्यासक्रम घेणारे शिक्षक विविध शालेय संस्था मध्ये अनेक वर्ष राबराब राबून कुठ जीवनात यशस्वी झालेले शिक्षक भावी पिढीना ज्ञानदान देत त्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी सदैव तत्पर असणारा वर्ग म्हणजे शिक्षक, अश्या परिस्थितीत स्वतःला विसरून आदर्श समाज घडविण्यासाठी धावपळ करत असताना स्वतः कडे दुर्लक्ष करीत जीवनाची वाटचाल करत जगणारा परंतु भावी पिढीला यश संपादन करण्याचे धडे देणारा समाजसेवक, ज्यांची थोडक्यात महत्ती देता येत नाही असा वर्ग, अवघ्या १३ वर्षा अगोदर भगवंतराव शिक्षणं महाविद्यालय अहेरी येथे एकवटलेला परंतु शिक्षण पूर्ण करीत अनेक मार्गांवर विखुरलेला मित्र वर्ग पुन्हा एकदा एकत्र येत आपल्या सुख:दुःखाची देवाण-घेवाण करण्यासाठी १३ वर्षांनी एकत्र आला.

या स्नेहमिलन सोहळ्यात प्रत्येकानी एकमेकांचे स्वागत करीत सुरवात केली. अनुषंगाने कॉलेज जीवनातील विविध प्रसंग आठवून रममाण झाले, संगीत, डान्सिंग विविध चॅलेंजिंग गेम खेळत जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकमेकांच्या सुखदुःखाची देवाण घेवाण केली. आयोजकांनी surprise भेटवस्तू बहाल केली.
सदर स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन मा. विजया देरकर (लोन गाडगे) यांनी अथक परिश्रम घेवून केल्याबदल तिचे सर्वांनी कौतुक केले व आभार मानले.