विरशहीद विर बाबुराव शेडमाके यांचे देश सेवेसाठी अमूल्य योगदान व आदिवासी बांधवानी एकत्र येऊन आपली संस्कृती जपावी – खासदार अशोकजी नेते यांचे प्रतिपादन

119

 

धानोरा/सावली:-गोटुल समिती व आदिवासी समाज बांधव तसेच गावकऱ्यांच्या वतीने धानोरा तालुक्यातील मौजा-मिचगांव खुर्द व सावली तालुक्यातील मौजा- कापसी या दोन ठीकाणी विर बाबुराव शेडमाके व भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पांदि पारी कुपार लिंगो तसेच सल्ला गांगरा यांच्या पुतळयांचे अनावरण सोहळा तथा समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दोन्ही ठिकाणच्या या अनावरण पुतळयांचा सोहळा गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते अनावरण सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना आदिवासी समाज बांधव एकत्रित येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यांच अभिनंदन व कौतुक करतो.खऱ्या अर्थाने या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी आदिवासी समाज बांधव इतर समाजाच्या तुलनेत आदिवासी बांधव सुद्धा मुख्य प्रवाहात यावा.यासाठी अनेक योजना आदिवासी समाजासाठी कार्यान्वित केल्या. काँग्रेसचा मुख्य समाचार घेत अनेक वर्ष सता उपभोग केले पण खऱ्या अर्थाने मोदीजी यांनी देशात १५ नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती निमित्य हा दिवस जनजाती गौरव दिन साजरा करण्यात तसेच देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती म्हणून सर्व प्रथम आदिवासी महिला राष्ट्रपती द्रोपदी जी मुर्मू यांची निवड केली यात सुद्धा पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांचा सिंहाचा व मोलाचा वाटा आहे.
विर बाबुराव शेडमाके यांनी देशासाठी लढले,असा विर लढवया पुरुष आपल्या समाजाच्या मातीत जन्मले याचा अभिमान वाटला पाहिजे.यासाठी त्यांचे विचार, आचार,आदिवासी समाज बांधवांनी आत्मसात करावा.यावेळी गावकऱ्यांनी सांगितलेल्या समस्या व अडी अडचणी जाणून घेत समस्यांचे निराकारण निश्चितच करण्यात येईल असे आश्वासित केले.

मिचगांव खुर्द येथे आयोजित केलेल्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून ,शनव वधू वरांस भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रामुख्याने मंचावर मिचगांव खुर्द येथे आमदार डॉ.देवराव होळी,महिला आघाडी तालुकाध्यक्षा लताताई पुऩ्घाटे,माजी तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे,भाजपा नेते हेमंत बोरकुटे,जेष्ठ नेत्या सुगंधाबाई उईके,सरपंच तुळशीदास गेडाम, उपसरपंच अनिल शेंद्रे,नगरसेवक संजय कोंडू, युवा मोर्चाचे नेते सारंग साळवे,तसेच मोठ्या संख्येने गोटुल समाज व आदिवासी समाज बंधुभगिनी, गावातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी प्रामुख्याने मंचावर कापसी येथे माजी जि.प. बांध. सभापती संतोष भाऊ तंगडपल्लीवार,कृ.उ.बा.स. संचालक तथा युवा भाजपा नेते सचिन सा.तंगडपल्लीवार,माजी पं.स. उपसभापती रविंद्र बोल्लीवार,उपसरपंच परशुराम भोयर,खासदार नेते साहेब यांचे सोशल मीडिया प्रमुख तथा ग्रा.प.सदस्य दिवाकर गेडाम,आदिवासी समाज अध्यक्ष पुरूषोत्तम शेडमाके, माजी सरपंच पत्रुजी परचाके,तंटामुक्ती अध्यक्ष निंबाजी चलाख, ग्रा.प.सदस्य जनार्दन गुरुनुले, भाजपा बुथ प्रमुख रोशन अंसारी,प्रदिप चलाख,तसेच मोठ्या संख्येने गोटुल समाज व आदिवासी समाज बंधुभगिनी, गावातील नागरिक उपस्थित होते.