हरांबा येथे आरोग्य व डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराला उत्स्पूर्त प्रतिसाद

138

 

ता. प्र.

सावली तालुक्यातील मौजा.हरांबा येथे आरोग्य तपासणी ,डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराला उत्सपूर्त प्रतिसाद मिळालेला आहे,राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मंत्री तथा सावली ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार विजयभाऊ वडेट्टीवार ह्यांचा संकल्पनेतून सावली तालुक्यात विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी ,डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर होणार आहेत.यावेळी ५००-६०० नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी तर ९००-१००० लोकांनी नेत्र तपासणी केलेली आहे तर ७०० च्या जवळपास लोकांना चष्मे वाटप झालेले आहे.

या सेवाभावी शिबिराचे उदघाटन माजी पंचायत समिती सभापती राकेश पाटील गड्डमवार यांनी केले तर अध्यक्षस्थानी सावली तालुका युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर कारडे प्रमुख उपस्थिती म्हणून हरांबाचे सरपंच देवानंद मानकर ,उपसरपंच प्रवीण संतोषवार,ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन कुनघाडकर,ग्राम काँग्रेस कमिटी लोंढोलीचे अध्यक्ष दिलीप लटारे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक खुशाल लोडे, उपसरपंच लोंढोली प्रमोद खोबे,युवक काँग्रेस सरचिटणीस रुपेश किरमे,सेवा सोसायटी संचालक हिरापूर मुखरू पाटील गोहने,,जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम तसेच ग्राम पंचायत सदस्य लोंढोली डोमाजी चौधरी,सौ.लक्ष्मीबाई भोयर,तसेच मा.विठ्ठल मंगर,मा.बादल गेडाम,मा.भूषण गुरुनुले,मा.संतोष शेंडे,मा.विपुल बोदलकर,मा.अमोल भोयर,मा.अभिषेक कुनघाडकर,मा.देवा गेडेकर यांच्या सह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते व बहुसंखेने नागरिक उपस्थित होते.