आत्ताची ब्रेकिंग न्यूज….सावली वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघाचा मृत्यू!

3907

*वनविभागात खळबळ*

सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवन क्षेत्रातील कापसी बीट परिसरात आज पहाटे च्या सुमारास गोसेखुर्द नहराच्या बाजूला शेतात पट्टेदार वाघाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.


सदर वाघाचा मृतदेह दिसल्याने त्या संदर्भातून वनविभागाला माहिती देण्यात आली.त्यानंतर वनपाल कोडापे सह वनविभागाची चमू लगेच घटनास्थळी दाखल होऊन सदर वाघाचा मृत्यू कसा झाला या संदर्भातून पंचनामा सुरू आहे.

 

वाघाच्या शवविच्छेदनानंतरच वाघाचा मृत्यू कसा झाला आहे उघडकीस येणार असून या वाघाचा मृत्यूने या परिसरात चांगलीच खळबळ माजलेली आहे.