पालेबारसा येथे आरोग्य व डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराला प्रचंड प्रतिसाद

171

 

विरोधी पक्षनेते,आमदार विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून सावली तालुक्यात सेवाभावी शिबिराचे तीन टप्यात आयोजन

 

तालुक्यातील पालेबारसा येथे आरोग्य तपासणी ,डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराचा उदघाटनाचा कार्यक्रम सावली तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मा.नितीन गोहने, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा सौ.उषाताई भोयर व कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे संचालक मा.खुशाल लोडे यांच्या हस्ते पार पडले.

राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मंत्री तथा सावली ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार ह्यांनी अंगीकरलेले जनसेवेचे व्रत हे सर्वपरिचित आहे, विजयकिरण फाउंडेशन च्या माध्यमातून ते सर्व सामान्य जनतेची सेवा करीत असतात त्यांच्यास संकल्पनेतून सावली तालुक्यात विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी ,डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर होणार आहेत.यावेळी ७००-८०० नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी तर ६००-७०० लोकांनी नेत्र तपासणी केलेली आहे तर ५०० च्या जवळपास लोकांना चष्मे वाटप झालेले आहे.

या सेवाभावी शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून पालेबारसाच्या सरपंच सौ.मंदाबाई मडावी,उपसरपंच रमेश खेडेकर,माजी उपसभापती प.स.सावली ,राजेंद्र भोयर,माजी सरपंच पालेबारसा ,विलास कावळे,माजी सरपंच सायखेडा ,जीवन चौधरी,माजी सरपंच ,प्रकाश खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य सौ.सुलोचना वाघरे,युवक काँग्रेस उपाध्यक्ष,सुशील डहलकर,माजी तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष ,वैभव गुज्जनवार व पंकज कागदेलवार,तसेंच काँग्रेस कार्यकर्ते प्रशांत मलोडे ,आकाश येणप्रेडिवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख ,कमलेश गेडाम,ग्रामपंचायत सदस्य जनकापूर ,हेमंत धुर्वे,,लोखंडे सर,माजी उपसरपंच ,प्रभाकर गुरुनुले,अंकुश येणप्रेडिवार,श्रीकांत सांगिडवार,कांशीराम दाजगाये,रमेश तिवाडे,रोशन राऊतकर, विठ्ठल मंगर,बादल गेडाम, यांच्या सह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते व बहुसंखेने नागरिक उपस्थित होते.