राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे उदघाटन

148

 

आज दि. 23 ला ह.भ.प. काळे महाराज यांचे कीर्तन कार्यक्रम

नगराध्यक्ष लताताई लाकडे अध्यक्षस्थानी

सावली(तालुका प्रतिनिधी) श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 55 वा पुण्यतिथी व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचा 68 वास स्मृतीदिन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सावली येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने दिनांक 23 व 24 डिसेंबरला आयोजित करण्यात आलेला आहे. दिनांक 23 डिसेंबर शनीवारला सकाळी पाच ते सहा वाजता ग्रामसफाई ,सकाळी सहा वाजता सामूहिक ज्ञान व त्यावर मार्गदर्शन, सकाळी सात वाजता योगा प्राणायाम, सकाळी नऊ वाजता घटस्थापना केले.सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध किर्तनकार हभप लक्ष्मणदास काळे यांचे कीर्तन आहे.

आज 11 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा प्रचार प्रमुख दादाजी नंदनवार यांनी केले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष लताताई लाकडे होते. तर प्रमुख पाहुणे ठाणेदार आशिष बोरकर,धनराज चौधरी, आंनदराव मोहजे,चंद्रशेखर देशमुख, विठ्ठलराव सुरसे यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालक सेवाधिकारी प्रभाकरराव गाडेवार यांनी केले तर आभार तालुका सेवाधिकारी सुधाकरराव गाडेवार यांनी मानले.

 

त दुपारी तीन वाजता हळदी कुंकू चा कार्यक्रम व सायंकाळी सहा वाजता प्रबोधन कार्यक्रम त्यानंतर सामाजिक प्रार्थना व रात्र आठ वाजता ह भ प लक्ष्मणदास काळे कीर्तनकार मोझरी धाम अमरावती यांच्या भव्य कीर्तनाचा कार्यक्रम सावली नगरपंचायत च्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे दिनांक 24 ला ग्रामसफाई गुरुदेवांची पालखी व मिरवणूक रामधून व भजन संध्या किर्तन पर कार्यक्रम व गोपालकालाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी दोन दिवसीय या भव्य महोत्सवात समस्त नागरिकांनी व गुरुदेव भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन सेवाधिकारी प्रभाकर गाडेवार,नामदेव गावतुरे ,शामराव अनंतलवार,सुधाकर गुंतीवार, सुधाकर कोलप्याकवार, शामराव नुत्तलवार,सुधाकर गाडेवार, व इतर मान्यवरांनी केलेला आहे