21 व्या शतकातील कौशल्ये विकसित व्हावीत

121

 

*सुलभक शिक्षकांचे मत : विदयार्थी गुणवत्ता व सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण*

सावली : भविष्यातील शालेय शिक्षण, अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाबाबत प्रशिक्षण शासकिय,स्थाणिक स्वराज्य संस्था,खाजगी अनूदानित शाळा आदिवासी विभागाच्याळा व सामाजि न्याय विभागाच्या शाळांतील इयत्ता 1 ली ते इयता 8 वी ला शिकविणा-या सर्व शिक्षकांचे प्रशिक्षणाचा पहिल टप्पा दिनांक 18 ते 22 डिसेंबर 2023 रमाबाई आंबेडकर विदयालय,सावली येथे सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत पार पडले.
सदर प्रशिक्षण उदघाटन प्रसंगी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती,सावली मान.मधुकर वासणिक साहेब,गट शिक्षणाधिकारी मान.संध्या कोणपत्तीवार मॅडम उपस्थित होते .मान.वासनिक साहेब गटविकास अधिकारी यांनी विविध दाखले देउुन शिक्षकांना प्रशिक्षणाची गरज,शिक्षकांची भुमिका,विदयार्थांचा सर्वागिण विकास होण्याकरीता काय काय करता येईल या प्रकाश टाकूण शिक्षकांनी विदयार्थ्यांना भयमुक्त वातावरणात कस अध्यापन करता येईल त्याकरीता आपली सुलभक म्हणून भुमिका राहील यावर प्रकाश टाकले. मान.गटशिक्षणाधिकारी मॅडम 21 व्या शतकातील कौशल्ये विदयार्थ्यांमध्ये विकसित व्हावी असे म‍त स्पष्ट केले.प्रत्येक मूल भविष्यासाठी तयार व्हावे,शंभर टक्के मुलांच्या क्षमतांचा विकास व्हावा यासाठी प्रामूख्याने मुलांना स्वत: शिकण्यास प्रेरित करणे,मुलांना शिकण्यासाठी आव्हान देणे,मूलांच्या जिज्ञासु वृत्तीचा सन्मान करणे,मुलांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग,मुलांच्या स्वत: च्या शिकण्याची गती तिप्पट करणे या पाय-यांवर आधारित हे प्रशिक्षण असेल.आपल्या शाळेतूनही जागतिक दर्जाचे भविष्य शिक्षण प्रत्येक शिक्षकाला देतांना व लर्निंग टू लर्न (शिकायचे कसे शिकणे) या महत्वपूर्ण कौशल्यावर भर सुलभाकांनी दिले.
सदर प्रशिक्षण करीता सूलभक म्हणून जिवण भोयर,स्वप्नील डोईजड,अविनाश घोनमोडे,धर्मा गावंडे,घनश्याम मेश्राम,रिंकी कोतपल्लीवार,शितल कन्नावार विपिन येनगंटटीवार व लोमेश बोरेवार यांनी आपली भुमिका पार पाडली. प्रशिक्षण उदघाटण सत्राचे सुत्र संचालन घनश्याम मेश्राम यांनी,पस्तावणा जिवन भोयर तर आभार प्रदर्शन अविनाश्‍ घोनमोडे यांनी केले.प्रशिक्षण यशस्वी करीता तालुका समन्वयक म्हणून कु.प्रिया गोडघाटे समा.तज्ञ,गट साधन केंद्र सावली सर्व विषय साधनव्यक्ती,समावेशित तज्ञ,विशेष शिक्षक,रोखपाल व रमाबाई आंबेडकर विदया सावली येथील मूख्याध्यापक मु.अ.शेंडे सर यांनी मोलाचे सहकार्य केले.सर्व प्रशिक्षणार्थी यांना दोनदा चाय व स्वादिष्ट जेवण देण्यात आले.प्रशिक्षणार्थी यांनी सदर प्रशिक्षणाबदल समाधान व्यक्त करुन विदयार्थी NAS,PISA पातळीवर नेण्याकरीता प्रशिक्षण चांगला आहे.असे आपल्या मनोगतामधुन स्पष्ट केले.

*या प्रश्नांचे निरसन*
शिक्षकांना अतिरिक्त कामामुळे विदयार्थ्यांना वेळ देता येत नाही.शिकविण्यास वेळ मिळत नाही.ही शिक्षकांची खंत असते यावर काय कतरा येईल जेणेकरुन विदयार्थ्यांचे शिकणे थांबणार नाही.तोंडात फेस येईप्रर्यंत शिकवूनही मुल शिकत नाहीत.खूप श्रम करुनही अपेक्षित परिणाम मिळत नाही.या सर्व प्रश्नांचे उत्तर शिक्षकांना मिळाले.