व्याहाड बूज. बसथांब्यावरील प्रवासी निवाऱ्याची दुरावस्था , प्रवाशांची गैरसोय

153

 

 

गडचिरोली चंद्रपूर महामार्गावर असलेल्या व्याहाड बूज. बसथांब्यावरील प्रवासी निवारा पाच वर्षापासून पाळझळ असल्याने प्रवाशांना प्रवासी निवारा असूनही , रस्यावर उभे राहावे लागत आहे.

सावली तालुक्यातुन जाणाऱ्या गडचिरोली चंद्रपूर ह्या मुख्य मार्गावर असलेल्या व्याहाड बूज. , मोखाळा , व्याहाड (खुर्द ) , किसाननगर , हिरापुर , चकपिरंजी , खेडी ह्या बसथांब्यावर शोभाताई फडणवीस आमदार असतांना प्रवाशांना ऊन पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी आमदार निधीतून प्रवासी निवाऱ्याची व्यवस्था केली. एवढेच नव्हे तर तालुक्यातील गडचिरोली चंद्रपूर या मुख्य मार्गाला जोडणाऱ्या आतील मार्गावरील सिंदोळा , उसेगाव , जीबगाव , पेठगाव , साखरी , लोंढोली , हरांबा , कढोली , डोनाळा , उपरी , भांशी , निलसनी पेठगाव , कापसी , सोनापूर , सामदा , व्याहाड बुज. इत्यादी ठिकाणी प्रवाशांना थांबण्यासाठी प्रवासी निवारे दिले.मात्र सदर प्रवासी निवारे बांधल्यापासून या प्रवासी निवार्याची देखभाल दुरुस्ती झाली नसल्याने अनेक प्रवासी निवार्याची तीनतेरा वाजले असुन अनेक प्रवासी निवार्यांचे छत उडाली आहेत. काही प्रवासी निवाऱ्यात कित्येकांनी आपला पोटापाण्यासाठी व्यवसाय सुरु केले आहे . प्रशांसाठी बांधण्यात आलेल्या प्रवासी निवार्याची अशी अवस्था असल्याने प्रवाशांना मोकळ्या जागेत किंवा ऊन पावसात बसथांब्यावरील पान टपरी , होटेल मध्ये थांबावे लागते आहे . सावली तालुक्याचा खेड्यातील गडचिरोली चंद्रपूर या मुख्य महामार्गाला जोडणाऱ्या व्याहाड बुज. येथील बसथांब्यावर परिसरातील व्याहाड बूज. , वाघोली , सामदा , सोनापूर , कापसी , उपरी , पेठगाव , भांशी , डोनाळा , कढोली इत्यादी गावातील नागरिक तालुक्याचा ठिकाणी शासकिय कामे , किंवा बाजारपेठ साठी तर विद्यार्थी शैक्षणिक कामासाठी व्याहाड बूज. बसथांब्यावर येवून पुढील प्रवास करतात . मात्र याठिकाणी असलेल्या प्रवासी निवार्याची दुरवस्था झाली असल्याने ऊन पावसात प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तेंव्हा संमधीत विभागाने प्रवाशांची समस्या लक्षात घेऊन या ठिकाणी प्रवासी निवारा बांधावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे .