देवाडा येथे ९ लाख ७४ हजार 900रुपये किमतीचा गांजा जप्त

389

 

*राजुरा पोलिसांची कारवाई*

राजुरा (प्रतिनिधी)-
राजुरा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील देवाडा येथिल राजु कोवे (वय ५५) रा. देवाडा व शंकर अर्जुन आत्राम (वय २५) राहणार देवाडा यांच्या घराच्या परिसरात गांजा झाडाची लागवड करून असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसानी कारवाई करीत 9 लाख 74 हजार 900 रुपये किमतीचे गांजा जप्त करीत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे
पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने (दि. १९) सायंकाळी चार वाजता सापळा रचून केलेल्या कारवाहीत झाडासहित ८५ किलो ६९० ग्राम वजन असलेला अंदाजे किंमत ९ लाख ७४ हजार ९०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार देवाडा गावातील राजु कोवे व शंकर अर्जुन आत्राम यांच्या घराच्या परिसरात व घरामागे गांजाची १५ झाडे आढळून आली असता घराची झडती घेऊन घरामध्ये असलेला ओलसर अवैद्य गांजा आढळून आल्याने कारवाई करीत गांजा जप्त करून त्यांच्यावर अप क्र. ६९१/२०२३ कलम २०२२ NDPS-अॅक्ट १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाही पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली राजुरा येथील ठाणेदार योगेश्वर पारधी, पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग हाके, ओमप्रकाश गेडाम, पोलिस हवालदार सचिन पडवे, कैलाश आलाम, योगेश पिदुरकर, रामराव बिंगेवाड, महेश बोलगोडवार, आकाश पिपरे, रंजना सोनपिपरे यांनी कार्यवाही केली आहे. सदर गुन्हयात आरोपीस अटक करून पुढील तपास सुरू आहे