रस्ते बांधकामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी केली जेसीबी,ट्रॅक्टर,टॅंकर ची जाळपोळ

608

 

गडचिरोली:- अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यात 19 डिसेंबर (मंगळवार) रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास माओवाद्यांनी रस्ता बांधकामासाठी आणलेल्या वाहनांची जाळपोळ केल्याची घटना घडली.ही घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

मागील काही दिवसापासून हिदूर-दोबुर- पोयरकोटी या रस्त्याचे बांधकाम सुरू होते. दिवसभर रस्त्याचे काम झाल्यावर रात्रीच्या सुमारास हिदूर या गावात वाहने ठेवतात. दरम्यान 19 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास जवळपास नक्षलवाद्यांनी हिदूर गावात येऊन वाहनांची जाळपोळ केली.यात तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबीचा समावेश असल्याची माहिती समोर येत असलेतरी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी एक जेसीबी जाळल्याची माहिती दिली आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी 2 ते 8 डिसेंबर पीएलजीए सप्ताह दरम्यान पोलिसांचे खबरी ठरवून तीन आदिवासी युवकांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर परत एकदा भामरागड तालुक्यात रस्ता बांधकामासाठी आणलेल्या वाहनांची जाळपोळ केली. यात संबंधित कंत्राटदाराचे मोठे नुकसान झाले आहे.

यावेळी त्यांनी पत्रक टाकले असून त्यात २२ डिसेंबर रोजी बंदचे आवाहन केले आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.