पोस्टाची लिंक फेल ग्राहकात प्रचंड नाराजी

256

सावली शहरात तालुक्याच्या ठिकाणावर असलेल्या पोस्ट उपशाखा येथे गेल्या पंधरा दिवसापासून लिंक बंद असल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे.

पोस्ट ऑफिस मध्ये दिनांक 4 डिसेंबर पासून आर डी चे संपूर्ण खाते, सेव्हिंग खातेदारांना पैसे टाकणे व काढण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे.त्यामुळे पोस्ट ऑफिस च्या कार्याबद्दल ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे.

सदर काम बंद पडण्यामागे बीएसएनएलची इंटरनेट सेवा कारणीभूत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. परंतु सदर बीएसएनएल चे कार्यालय प्रमुख सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पंधरा दिवसापासून पोस्ट कार्यालयातील ग्राहक चांगलेच संतप्त झालेले आहे. या संदर्भातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता लवकरच सुरू करू असे त्यांनी सांगितलेले आहे मात्र सदर बंद पडलेले काम हे केव्हा सुरू हो