अंधश्रध्दा ही मानसिक गुलामीचे लक्षण…

325

सौरव गोहने :-
मूल(प्रतिनिधी)-
डिजिटल युगातही अंधश्रद्धा वाढतच असून हे मानसिक गुलामगिरीचे लक्षण असून यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक आहे नाहीतर व्यक्ती सोबत समाजाचेही शोषण होत असते,असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते तथा पत्रकार संतोष कुंदोजवार यांनी केले
मूल येथील नवभारत विद्यालय येथे अंधश्रद्धा व बुवाबाजीवर आधारित भांडाफोड करणारे प्रात्यक्षिक प्रयोगकरून विद्यार्थ्यांना वैज्ञाणीक दृष्टिकोन त्यांनी समजावून सांगितले याप्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक झाडे सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रबोधनकार तथा पत्रकार संतोष कुंदोजवार,बार्टी पुणेचे समतादूत उपेंद्र वनकर, सहायक शिक्षक गुरुदास चौधरी,विकास मोडक, निलेश माथनकर,शिक्षिका प्रतिमा उमक,वर्षा भांडारकर,विजय निखारे,राजू बोढे, पुनमचंद वाळके,सुनील चौधरी,कुमारी माधुरी तलांडे ,आनंदराव फलके, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते
यावेळी अंगात येणे,कापूर हातावर जाळणे,हवेत नारळ फिरविताच आग लागणे,लिबातून केस,कपडा काढणे,नारळातून कपडे काढणे, कानाद्वारे चिठी वाचणे,इत्यादी प्रयोग करून त्यामागील वैज्ञानिक कारणे विद्यार्थ्याना समजावून सांगितले यांचे सोबतीला बार्टी पुणे चे समतादूत उपेंद्र वनकर यांनी साथ दिली तसेच गितगायन सादर केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी नंदिनी वालदे यांनी केले प्रास्ताविक कामेश्वरी गुंडोजवार तर सलोनी दोहणे हिने आभार मानले
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी,आणि विद्यार्थ्यानी सहकार्य केले