झाडीबोली महिलारत्न पुरस्काराने वृंदा पगडपल्लीवार सन्मानित

244

झाडीबोली महिलारत्न पुरस्काराने वृंदा पगडपल्लीवार सन्मानित. .

झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर, आणि मूल शाखेच्या संयुक्त विद्यमाने पहिले महिला झाडीबोली साहित्य संमेलन मूल येथील बालविकास प्राथमिक शाळेत नुकतेच संपन्न झाले.या कार्यक्रमात कवयित्री वृंदा पगडपल्लीवार यांच्या कार्याची दखल घेत झाडीबोलीच्या चळवळीत नेहमीच सक्रिय असल्यामुळे त्यांना ३ डिसेंबर २०२३ ला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माननीय हंसराज भैया अहिर यांच्या हस्ते झाडी महिला रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.वृंदा पगडपल्लीवार या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनासूर्ला,मूल येथे कार्यरत आहेत.

या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष जेष्ठ कवयित्री शशिकला गावतुरे , स्वागताध्यक्ष माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर ,जेष्ठ साहित्यिक बंडोपंत बोढेकर , डॉ विशाखा कांबळे डॉ. चंद्रकांत लेनगुरे कवी अरुण झगडकर तसेच बरेच मान्यवर उपस्थित होते.

कवयित्री वृंदा पगडपल्लीवार आत्तापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित आहेत.तसेच त्यांचा वृंदावन अभंगसंग्रह प्रकाशित आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.