अखेर वेजगावात धुमाकूळ घालणारा बिबट जेरबंद,,,

283

राजुरा(संतोष कुंदोजवार)-

मागील महिन्यापासून गोंडपीपरी तालुक्यातील धाबा वन परिक्षेत्र अंतर्गत वेजगाव येथे बिबट्याची दहशत होती अथक प्रयत्नानंतर आज दिनांक 8 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास बिबट पिंजर्यात अडकला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला,
वेजगाव परिसरात मागील एक महिन्यापासून बिबट्याची चांगलीच दहशत पसरली होती शेतीवर जाणे बंद होते रात्री गावात येऊन बकरी,कुत्र्याला बिबट्याने शिकार केली होती काही वरश्यापूर्वी याच गावात बिबट्याने दहशत माजवीत दोघांचा जीव घेतला होता
वन विभागणी याची गंभीर दखल घेऊन तीन पिंजरे लावलेले होते,वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव बोबळे यांचे नेतृत्वात क्षेत्रसहायक झाडे,वनरक्षक प्रशांत मडावी,दीपक कुलमेथे, पीआरटी चे सुरक्षा रक्षक हे स्थानिक लोकांच्या मदतीने रात्र दिवस गस्त करीत होते दरम्यान आज दिनाक 8 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गाबाबाहेर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट अडकला याची माहिती माहीत होताच वनकर्मचारी पोलीस पोहचले आणि नागरिकानीही मोठी गर्दी केली होती
उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांचे मार्गदर्शनात प्रभारी सहायक वनसंरक्षक संदीप लंगडे ,वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव बोबळे यांनी पुढील कारवाई करीत बिबट्याला चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र उपचार केंद्रात हलविण्यात येणार असल्याचे वणाधिकार्यानी सांगितले ,बिबट्याला जेरबंद केल्याने या भागातील जनतेनी सुटकेचा निश्वास सोडला असून वनकर्मचार्याचेही अभिनंदन केले