निफंद्रा मार्गे गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूची वाहतूक!

377

 

सावली तालुक्यातील निफंद्रा या मार्गाने कोटगल ब्यारेज चा वापर करून चोरट्या पध्द्तीने अवैध देशी सह विदेशी दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र दिसत आहे.मात्र या कडे पाथरी पोलिसांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार दिसत आहे.

गडचिरोली जिल्यात दारू बंद असल्याने अनेक जण गडचिरोली च्या राष्ट्रीय मुख्य मार्गाचा वापर करणे टाळून चोरट्या मार्गाने पुरवठा करीत आहे.दुचाकी वाहना सह चार चाकीने वाहतुकीची प्रकार सर्वात जास्त आहे सदर वाहतूक सुरू असतांना ही अबकारी विभाग चंद्रपूर,पोलीस उपविभागीय मूल व पाथरी पोलिस यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक जण आश्चर्य व्यक्त करीत आहे.मात्र याकडे प्रकाराकडे तत्पर असलेले पोलीस अधीक्षक लक्ष देतील काय?असा प्रश्न या परिसरातील सामान्य जनता विचारत आहे.