मार्कंडा तीर्थक्षेत्रासाठी निधी कमी पडू देणार नाही -नामदार सुधीर मुनगंटीवार

328

 

*पद्मशाली समाजाचा उपवधू वर परिचय मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद*

*चंद्रपूर(प्रतिनिधी)*
विदर्भाची काशी तसेच पद्मशाली समाजासोबत इतरही समाजाचे आराध्य दैवत असलेले श्री क्षेत्र मार्कंडा देवस्थानाचा पर्यटन विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक वन मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. चंद्रपूर येथे पद्मशाली फाउंडेशन च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय उपवधू वर परिचय मेळाव्याच्या निमित्ताने सत्कार प्रसंगी ते बोलत होते.

पद्मशाली फाउंडेशन च्या वतीने आयोजित तथा पद्मशाली समाज चंद्रपूर यांच्या सहकार्याने चंद्रपूर येथील जिजाऊ सभागृह येथे राज्यस्तरीय उप वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाचे प्रसंगी केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष, माजी खासदार हंसराज अहिर, वरोरा -भद्रावती क्षेत्राचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
या मेळाव्याचे उद्घाटन चंद्रपूर जिल्ह्याचे प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉक्टर अशोक वासलवार यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्षपदी डॉक्टर चंद्रशेखर अल्लेवार होते तर अध्यक्षस्थानी डॉक्टर सुधीर बोद्दुन छत्तीसगड उपस्थित होते.

यावेळी प्रमुख अतिथी रमेश सुंकुरवार,राजू नागुलवार, धनंजय चामलवार, विजय यंगलवार,राजू आनंदपवार,रश्मी परसावार, नरेश पंपनवार, गोपाल परसावार, रोहित बोम्मावार, अमोल नाडेमवार, प्रमोद चिलवे,सुनील बिंगेवार, सुधीर मुळेवार,प्रवीण मुळेवार,दिलीप दुसावार, अमोल बोदुन,ओमप्रकाश यंगलवार, संग्राम निलपत्रेवार,शंकरराव कुंटुरकर, नागनाथ गड्डम,शिवाजी अन्नमवार,मोरेश्वर अंदेवार,दिनेश आकनूरवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी पद्मशाली समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक सतीश बोम्मावार, गणेश वासलवार, सौ.स्मिता वासलवार, दर्शन गोरंटीवार,संतोष कोकुलवार, सौ.अपूर्वा चिंतलवार यांचा सत्कार करण्यात आला.तसेच पद्मशाली फाउंडेशन ला निशुल्क अँप बनवून दिल्या बद्दल सचिन बासनवार,धीरज आकनूरवार, स्मिता आकनूरवार, व रणजी खेळाडू सुनिकेत बिंगेवार नागपूर यांचाही सत्कार करण्यात आला.

पद्मशाली समाजातील बेरोजगार युवकांची फळी लक्षात घेता त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी तसेच त्यांच्यासाठी नवे दार निर्माण करण्यात यावे व समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून श्री मार्कंडेय आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी यावेळी प्रास्ताविकातून पद्मशाली फाउंडेशनचे अध्यक्ष सूरज बोम्मावार यांनी केले.
या वधु वर परिचय मेळाव्यासाठी राज्यभरातून तसेच छत्तीसगड तेलंगणा गुजरात या परिसरातूनही मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित झाले होते 265 उपवरांनी यावेळी प्रत्यक्ष मंचावर आपला परिचय दिला तर शेकडो समाज बांधवांनी यावेळी उपस्थिती दर्शविली प्रत्यक्ष नोंदणीची घेऊनच मेळाव्याला प्रवेश देण्याचा हा अभिनव उपक्रम पद्मशाली समाजाचा इतिहास पहिल्यांदाच घडला आणि तो यशस्वी सुद्धा झाला यावेळी अनेकांनी पद्मशाली फाउंडेशनच्या या कार्यास शुभेच्छा दिल्या या मेळाव्याचे संचालन सुरेश वासलवार प्रशांत जिनेवार शिल्पा कोंडावार यांनी केले तर आभार पद्मशाली फाउंडेशनचे सचिव किशोर आनंदवार यांनी मानले. दोन टप्प्यात यशस्वी पार पडलेल्या मेळाव्याचे संचालन संतोष गोटमुकुलवार,प्रफुल तुमेवार, सपना येनगंदेवार, डॉ.शितल वडलकोंडावार, श्रीकांत कोकुलवार,यांनी केले तर आभार उपाध्यक्ष लोकेश परसावार यांनी मानले. यावेळी पद्मशाली फाउंडेशन चे सर्व संचालक तथा पद्मशाली समाज चंद्रपूर महिला संघम, युवा संघम यांनी अथक परिश्रम घेतले.

*बॉक्स*
पद्मशाली समाजातील बेरोजगार युवकांची फळी लक्षात घेता त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी तसेच त्यांच्यासाठी नवे दार निर्माण करण्यात यावे व समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून श्री मार्कंडेय आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी यावेळी पद्मशाली फाउंडेशनचे अध्यक्ष सूरज बोम्मावार यांनी केली.