धारदार चाकूच्या हल्ल्यात 19 वर्षीय तरून गंभीर जखमी ; मुल तालुक्यातील घटना

1400

 

 

मूल (प्रतिनिधी): जुन्या वादातुन एका 19 वर्षीय तरुनावर चाकुने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथे गुरूवारी रात्रौ 8.30 वाजता दरम्यान घडली. सुजल विनोद बुबडे वय 19 वर्षे रा. गडीसुर्ला असे गंभीर जखमी मुलाचे नांव आहे तर भुषण राजु चचाणे वय 19 वर्षे, गणेश अशोक शेंडे वय 19 वर्षे रा. मूल असे आरोपीचे नांव आहे.
पोलीस सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथील सुजल विनोद बुबडे रा. गडीसुर्ला हा मूल येथे आपल्या आजीकडे राहुन शिक्षण घेत होता, दरम्यान गुरूवारी तो गडीसुर्ला येथे गेला होता, रात्रौ 8.30 वाजता दरम्यान तो गावालगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ असताना मूल येथील भुषण राजु चचाणे वय 19, गणेश अशोक शेंडे वय 19 वर्षे या दोन्ही मित्रांनी मिळून जखमी सुजलवर धारदार चाकुने पाठीवर आणि पोटावर हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमी सुजलला मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार साठी नेण्यात आले व पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे हलविण्यात आले. असून मूल पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळावर पोहचुन पंचनामा करून सदर आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींवर भांदवी कलम 307 (34) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेची पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकाअर्जुन इंगडे, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र मोरे करीत आहे.