विजय वडेटटीवारांचे “सारथ्य “व संतोष रावतांची “तिरंदाजी “

878

विरोधी पक्षनेते, राजयोगी ,रणवीर विजय वडेटटीवार मैदानात ज्याच्या रथाचे सारथी बनतात तो भरमार तिरंदाजी करण्याची संधी सोडणार नाहीच. मूल येथील भव्य आक्रोश मोर्चात विरोधी पक्षनेत्यांनी बैलबंडीचे सारथ्य केले ज्यात भविष्यातील
विधानसभा निवडणुकीचा अपेक्षीत चेहरा असलेले जिल्हा मध्यवतीं सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत योद्धा बनून विराजमान होते.

शेतकरी रथातून उतरुन व्यासपिठावर संतोष रावतानी जी
भरमार शाब्दिक तिरंदाजी केली ती बघता ना.सुधीर मुनगंटीवार आमदार व पालकमंत्री म्हणून असफल असल्याचा खडा आरोपच रावतांनी केला. भरमार आरोपातले किती शब्दबाण हवेत विरले व किती लक्षभेद
करणारे होते हा विषय जरी सोडला तरी मूल बल्लारशा विधानसभेत टक्कर देण्याची संतोष रावत यांची मनिषा स्पष्ट दिसली.


राजयोगी विजय वडेटटीवार ज्याचे सारथी असतील तो योदधा शस्त्र चालविण्यात मागे कसा काय राहू शकतो? वाघनखे आणायला लंडन ला गेलेले ना.मुनगंटीवार वाघनखे तर आणू शकले नाहीत मात्रं नोटा घेऊन आलेत किंवा राममंदिरासाठी २५ लाखाच्या सागवानापोटी साडेतीन करोड चा रिटर्न गिफ्ट घेऊन आलेत हा गंभीर शब्दास्त्र फेकण्याचे संतोष रावत यांचे धैर्य राजयोगी विजय वडेटटीवार यांच्यासारखा सारथी लाभल्याचाच ” साईड इफेक्ट ” असल्याची चर्चा रंगली.

 

विधानसभा क्षेत्रातील पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासी बांधवांची व्यथा व इथेही ना.मुनगंटीवार यांना
असंवेदनशिल संबोधून विधानसभा क्षेत्रात आपली व्याप्ती वाढवून रावतांनी राजकिय चूणूक दाखवून
दिली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना जिल्यातील राजकारणाचा चमकता सितारा म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. नगराध्यक्ष,बाजार समिती सभापती,जिल्हा परिषद अध्यक्ष,मध्यवतीं सहकारी बँकेचे अध्यक्ष अशी राजकिय वाटचाल व त्यातून वाढलेली राजकिय महत्वाकांक्षा व आता राजयोगी विजय वडेटटीवार यांचे “सारथ्य” स्वाभाविकच रावत यांना ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार
यांना आव्हान देण्यास शक्ती प्रदान करणारे ठरत आहे.

मूल तालुक्यात पक्षांतर्गत विरोधकांना थंड करण्यात संतोष रावत यांना कला गवसली आहेच.विधानसभा क्षेत्राचा विचार करता मुरब्बी ना.सुधीरभाऊंचा शब्दशस्त्राने सामना करणे हाशास्पद ठरणार आहे हे रावत जाणून आहेत.
विजय वडेटटीवार यांच्यासारखा दबंग राजयोगी आपल्या रथाचा सारथी हवा याचीही जाणीव त्यांना आहे. विधानसभेची उमेदवारी मिळवून प्रत्यक्ष मैदानात रणवीर ठरण्यासाठी वडेटटीवार यांचेशिवाय इतर पर्याय
सध्यातरी नसल्याचे चाणाक्ष रावत जाणून आहेत. आपण गुरु असलो तरी वडेटटीवार महागुरु आहेत या
जाणिवेतूनच आपल्या विजयी रथाचा सारथी त्यांना बनवून आपल्या शस्त्रांना अधिक धारदार करण्याकडे रावत यांचा कल असणे राजकिय दृष्ट्या हिताचेही आहे. विधानसभा हुकली तरी पुढेमागे विधानपरिषद गाठण्याची धमक असलेल्या रावत यांना सारथी मात्रं लयभारी गवसला हे विरोधकांनासुद्धा मान्य करावे लागेल.
! जय माता दी !