तुटलेल्या ताराच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्यू

4148

महावितरणच्या भोंगळ कारभाराने शेतकऱ्याचा नाहक बळी

सावली तालुक्यातील जांब रयतवारी येथील शेतकरी प्रकाश महादेव कोहळे यांचे आज सकाळी 9 वाजता शेती पाहणी करण्याकरिता गेले असता, खांबाच्या तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने करंट लागून त्याचे निधन झाले.सदर शेतकरी नेहमी प्रणाने सकाळी उठून शेत पाहणी करण्याकरिता शेताकडे गेले, परंतु बराच काळ लोटूनही घरी न परतल्याने घरच्यांनी शेताकडे धाव घेतली असता शेतकरी प्रकाश कोहळे हे नाल्याजवळ मृतावस्थेत आढळून आले.

 

सदर घटना ही महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे घडल्याची लोकांत चर्चा आहे, महावितरणने वेळोवेळी खांबावर आलेल्या झाडांची छाटणी केली असती तर आज या शेतकऱ्याला जीव गमवावा नसता लागला.महावितरणच्या चुकीमुळे घरचा कर्ता जीव गमावल्याने परिवाराची खूप मोठी हानी झालेली आहे.करीत महावितरने जास्तीत जास्त आर्थिक मदत कुटुंबियांना देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे.