
गोसेखुर्द नहारात पाय घसरून पडल्याचा संशय

सावली (तालुका प्रतिनिधी)
सावली शहरातील प्रज्वल रोशन डोहणे वय २१ वर्षे हा युवक शनिवारी सकाळीं सात वाजताच्या सुमारास घराशेजारी असलेल्या राहुल उंदिरवाडे या मेहुण्या सोबत शेतावर युरिया टाकण्यासाठी गेला होता. शेता शेजारी असलेल्या गोसीखुर्दच्या कालव्या जवळ प्रज्वलला राहुलने थांबायला सांगितले व तो खत टाकण्यासाठी दोन मजूर पाहण्यासाठी चकपिरांजीला गेला.
मजूर मिळाल्यावर राहूल नहर जवळ येऊन पाहिला असता तो दिसला नाही त्यामुळे राहूलला वाटले की प्रज्वल घरी गेला असेल असे वाटले. खत टाकून झाल्यावर राहूल प्रज्वलच्या घरी गेला तर प्रज्वल घरी नव्हता. ही माहिती घरच्यांना दिली. घरचे लोक, पोलिस प्रशासन, तालुका आपतकालीन बचाव पथक तीन दिवस सतत गोसीखुर्दच्या नहरात शोध घेत होते. प्रज्वलचे हात खताच्या पिशवीने भरले होते त्यामुळे तो नहराच्या पाण्यात हात घुवायला गेला आणि कदाचित त्याचा पाय घसरुन पडला असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे.
आज सोमवारला सायंकाळीं सहा वाजता गोसिखुर्दच्या नहरात गडीसूर्ला जवळ त्याचा मृतदेह आढळला. घरातील एकुलता एक तरुण हुशार मुलगा मृत पावल्याने सावली शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.