
सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

सावली(तालुका प्रतिनिधी)
बोथली ते पेंढरी-पाथरी या मार्गावर मोठ्या प्रमाणे रस्त्यावर खड्डे पडले असतानाही याकडे सावली सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र डोळे झाकपणा करून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. बोथली नदीजवळील एक मोठा खड्डा हा अनेक दिवसापासून पडलेला असून या खड्ड्यामुळे काही जणांचा अपघात सुद्धा झालेला आहे त्यात त्यांना दुखापती झालेली आहे सदर रस्त्यावरील खड्डा मध्ये पाणी साचल्यानंतर अनेक जण या खड्ड्यामुळे पडून जखमी झालेले आहे.त्यामूळे तो खड्डा जीवघेणी खड्डा ठरणार असेच चित्र एकंदरीत दिसत आहे.
पेंढरी ते पाथरी मार्गावर काही ठिकाणी खड्डे हे थातूरमातूर खड्डे बुजविण्यात आल्याचे दिसत आहे. मात्र त्याच खड्ड्यांच्या बाजूंना अनेक खड्डे असतानाही हे खड्डे बुजवण्याचे काम संबंधित विभाग योग्य करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फक्त खुर्चीवर बसून सर्वच करीत असल्याचा ताव आणणारे अधिकारी यांना रस्त्यावरील खड्डे का दिसत नाही असा प्रश्नही नागरिक करीत आहेत. मात्र हा खड्डा बुजवण्याची साधी अक्कलही या विभागाचा अभियंताला न येणे हे त्यांच्या कार्याचे कसले प्रतीक आहे.
त्यामुळे संबंधित खड्ड्यासह पाथरीपर्यंत पडलेले अनेक खड्डे हे केव्हा भूजणार असा प्रश्न या भागातून वाहतूक करणारे प्रवासी करीत आहे त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अशी मागणी ही या भागातील नागरिकांनी केलेले आहे.