गोसेखुर्द विभागाने शेतात टाकलेल्या पाईपानां पडले भगदाळ;शेतकर्यांचे लाखों रुपयांचे नुकसान

512

सावली तालुक्यातील निफंद्रा येथील शेतकरी प्रमोद आहेत यांच्या शेतजमिनीवर मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी कापूस पीक घेण्यात येत आहे सदर पिके हे डौल दार पिके असतानाच गोसेखुर्द कालवा ब्रम्हपुरी अंतर्गत येत असलेल्या निफंद्रा येथे शेतात करण्यात आलेल्या पाईप च्या कामामुळे योग्य काम नसल्याने पाण्याचे मोठ्या प्रमानात लिकेज सुरू आहे.त्यातच प्रमोद धाइत या शेतकऱ्यांच्या शेतात पाईपच ला भगदाळ पडल्याने संपूर्ण शेती जलमय झाली असल्याने त्यांचे अंदाजे 25 लाखाहून अधिक नुकसान झाले आहे.

या संदर्भात त्यांनी सावली तहसीलदार यांचे कडे लेखी तक्रार केली असून गोसेखुर्द विभागाला ही तक्रार केली आहे मात्र गोसेखुर्द विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पाईपमधील पाणी बंद करावे अन्यथा पुन्हा अधिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.