व्याहाड खुर्द येथे 19 ऑक्टोबरला गौतमी पाटील यांच्या लावणी महोत्सव

426

सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे नवरात्र निमित्य निखिल सुरमवार मित्र मंडळ परिवार तर्फे दिनांक 19 ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजता निखिल सुरमवार यांचा मैदानात सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचा लावणी महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

 

या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रह्मपुरी-सावली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत,माजी जीप उपाध्यक्ष संदीप गड्डमवार,माजी जीप अध्यक्ष सतीश वारजूरकर,प्रदेश कांग्रेस महासचिव नामदेव किरसान, चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष रोहित बोम्मावार,माजी सभापती दिनेश चिटनूरवार,कृ.उ.बा.स.संचालक प्रशांत चिटनूरवार,पद्मावती फाऊंडेशन चे अमोल नाडेमवार,तालुका कांग्रेस चे अध्यक्ष नितीन गोहणे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहे.तरी या लावणी महोत्सव कार्यक्रमाला हजारोच्या संख्यनें उपस्तीत राहावे असे आवाहन युवा कांग्रेस नेता तथा बाजार समितीचे संचालक निखिल सुरमवार व मित्र मंडळी यांनी केले आहे.