
जि प नवेगाव रै येथील एकूण पाच विद्यार्थ्यांची निवड

जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे सन 2023 24 मध्ये इयत्ता सहावी साठी चिरंजीत बारई या विद्यार्थ्यांनी कुणघाडा आपला प्रवेश निश्चित केलेला आहे.
सन 2023 24 मध्ये इयत्ता सहावी साठी जवाहरलाल नवोदय विद्यालय समितीने दिनांक 29 एप्रिल 2023 ला प्रवेश परीक्षा घेतलेली होती या निवड परीक्षेचा प्रथम निकाल दिनांक 23 जून 2023 ला जाहीर करण्यात आला. 80 जागांपैकी 73 विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला. सात जागेसाठी जवाहरलाल नवोदय विद्यालय समितीने दिनांक 27 सप्टेंबर 2023 ला प्रतिक्षा यादी जाहीर केली. या यादीमध्ये चिरंजीत रणधीर बारई या विद्यार्थ्यांनी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नवेगाव रे केंद्र कुनघाडा पंचायत समिती चामोर्शी येथील शाळेतील प्रथम यादीमध्ये रोशन वसंत गेडाम, दिव्या राजेंद्र बुरांडे , ऐश्वर्या अनिल उडान , ओमेश्वरी मनोहर पिपरे या विद्यार्थ्यांची निवड झालेली होती चिरंजीची निवड होऊन शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. एकाच शाळेतील पाच विद्यार्थ्यांची निवड होणारी जिल्ह्यातील ही एकमेव शाळा आहे.
चिरंजीत च्या यशाचे अभिनंदन पंचायत समिती चामोर्शी चे गटशिक्षणाधिकारी श्री नरेंद्र मस्के सर, कुनघाडा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री गोमासे सर, ग्रामपंचायत नवेगाव रै चे सरपंच श्री डंबाजी खोडवे, शाळेचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग उडान सर, शाळेतील शिक्षक श्री आशिष येल्लेवार सर, श्रीमती प्राजक्ता मेश्राममॅम, श्रीमती शैला तुरे मॅम, कुमारी कविता गोंगलेमॅम, श्री प्रवीण टोंगे सर, श्री शरद दोहतरे सर, कुमारी शितल धाडसे मॅडम, कुमारी विजया तुलावे मॅडम, कुमारी नभा जनबंधू मॅडम यांनी अभिनंदन केले
मुले स्वतः शिकतात यावर माझा विश्वास होता. मुलांना शिकवीण्यावर अधिक भर न देता त्यांना शिकण्यासाठी प्रेरित केले आणि चिंतन आणि मनन या मानसिक प्रक्रिये दरम्यान नेहमी विद्यार्थ्यांच्या सोबत राहिले. पुरेसा प्रश्नपत्रिकाचा सराव व तंत्रज्ञानाची मदत यामुळे माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना हे यश गाठता आले असे मत मार्गदर्शक शिक्षक आशिष येल्लेवार यांनी व्यक्त केले.