
सावली येथील गणेश विसर्जना दरम्यानची घटना

सावली: तालुक्यातील गणपती विसर्जना करिता गेलेल्या सावली तालुक्यातील तीन युवकांचा गोसीखुर्द च्या नहरात बुडून दुर्दैवी करून अंत झाला.या घटने संबंधित माहिती मिळताच खासदार अशोकजी नेते यांनी आज तात्काळ सावली तालुक्यातील चांदली बुज व सावली येथे जाऊन मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी कुटुंबाला आर्थिक मदतही केली.
यात सावली येथील सचिन दिवाकर मोहुर्ले वय ३३ वर्ष तर सावली तालुक्यातील चांदली बुज येथील निकेश हरिभाऊ गुंडावार ३३ वर्ष व संजय हरिभाऊ गुंडावार वय ३१ वर्ष हे एकाच कुटुबांतील व्यक्तीयांचा समावेश होता. मृत्यू पावलेले तिन्ही युवक कुटुंबातील हे एकमेव कमावतेच व्यक्ती असल्याने अतिशय दुर्दैवी घटना घडली,खासदार अशोक नेते यांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त करत मी आपल्या दुःखात सामील आहो.जे काही अडीअडचणी असेल मला कळवावे,व शासन स्तरावर पाठपुरावा करून लवकरात लवकर मदत मिळवुन द्यावी,असे निर्देश तहसीलदार पाटील यांना खासदार अशोक जी नेते यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी प्रामुख्याने महामंत्री तथा नगरसेवक सतिश बोम्मावार, कोषाध्यक्ष अर्जुन भोयर, तहसिलदार परिक्षित पाटील, जेष्ठ नेते प्रकाश पा.गड़्मवार, प्रकाश खजांजी, अशोक आकुलवार, शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, चांदली बुजचे सरपंच विठ्ठल येगावार,भाजपा शाखा अध्यक्ष अनिल येनगंटीवार,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद धोटे,गौरव संतोषवार,राकेश विरमलवार, हरिष जक्कुलवार,मनोज अब्रोजवार, तसेच भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.