कर्मवीर विद्यालयात स्वच्छता पंधरवडा अभियानाचा  समारोप

63

कर्मवीर विद्यालयात स्वच्छता पंधरवडा अभियानाचा  समारोप

राजुरा(संतोष कुंदोजवार)

महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्य कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय,लाठी येथे वक्तृत्व स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,वृक्षारोपन असे विविध उपक्रम राबवून स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात आला
आज 2 ऑक्टोबर 23 रोजी कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय लाठी येथे महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचे प्रतिमेस प्राचार्य तथा मुख्याध्यापक सुधाताई वासाडे आणि सर्व प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांचे हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले मान्यवरांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले त्यानंतर शाळा व परिसरात हात झाडू घेऊन परिसर स्वच्छता केली
याप्रसंगी प्राचार्य सुधा वासाडे,प्राध्यापक सुरेश पिंपळकर, वामन मोरे,अरुण नक्षीने,सहायक शिक्षक देवानंद ढुमणे,चंद्रकांत आसुटकर,सतीश मेश्राम,लिपिक अंकुश वनमाळी, संतोष कुंदोजवार ,शिक्षकेतर कर्मचारी सुरेश खेडेकर,किशोर देवाडकर ,आणि सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते