सोनापुर येथे युवा सार्वजनिक गणेश मंडळा तर्फे आरोग्य तपासणी शिबीर

420

सावली तालुक्यातील सोनापुर येथे आज दिनांक २६/०९/२०२३ ला सोनापुर चा राजा युवा सार्वजनिक गणेश मंडळ व आयुष्मान भारत कार्यक्रमा अंतर्गत १८ वर्ष्यावरील पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली.


यावेळी आरोग्य तपासणी करताना सामुदाई अधिकारी हजारे मॅडम आरोग्य सेवेक भोंडे साहेब यांच्या सयुंक्त विधमाने आरोग्य शिबिराचे आयोजन युवा सार्वजनिक गणेश मंडळामध्ये करण्यात आले.


यावेळी युवा सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष दिनकर वाघाडे, उपाध्यक्ष मनोज कोसरे सचिव पंकज रणदिवे, श्रीधर सोनुले, आकाश कोसरे, राहुल भंडारे, कैलास वाघाडे, राहुल रणदिवे, प्रफुल राउत, या वेळी युवा सार्वजनिक गणेश मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमाला गावातील मोठ्या संखेने उपस्थित होते.