
बोथली येथे अष्टविनायक गणेश मंडळा तर्फे रक्तदान शिबिर ला उत्तम प्रतिसाद

सावली पासून पाच किलोमीटर अंतर असलेल्या बोथली येथे सार्वजनिक अष्टविनायक गणेश मंडळ बोथली व जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद शाळा बोथली येथे करण्यात आले.
गणेश मंडळाच्या माध्यमातून अनेक सामजिक उपक्रम राबविने महत्वाचे आहे त्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी निर्माण होण्यास मदत होते.रक्तदान हे जगातील सर्वात श्रेष्ठ दान आहे. रक्तदान शिबिराचे आयोजन करणारे बोथली येथील गणेश मंडळ हे तालुक्यातील पहिले गाव आहे असे शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी म्हटले.अश्या सामाजिक उपक्रमासाठी आपल्याला लागेल तेव्हा सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी बोरकर यांनी दिले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोथली येथील सरपंच सुशील नरेड्डीवार,उपसरपंच नरेश गड्डमवार,सावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सूरज बोम्मावार,पत्रकार
प्रा.शेखर प्यारमवार,चारुदत्त राऊत जिल्हा रुग्णालय गडचिरोली,ताराचंद खोब्रागडे पोलिस पाटील, दुमाजी आदर्लावार मुख्याध्यापक आदींची उपस्थिती होती.
आयोजित रक्तदान शिबिरात गावातील ३४ युवक, पुरुष व महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले.विशेष बाब म्हणजे रक्तदान शिबिरात सामाजिक बांधिलकी म्हणून महिलांनी सुद्धा सहभाग नोंदविला.
रक्तदान शिबिराचे यशस्वीतेसाठी निलेश पूटकमवार,नितेश रामीडवार, दुर्वास आत्राम,उत्तम दलांजे,राहुल मुठ्ठावार,अरविंद मुट्ठावार,अभिजीत पाडेवार तसेच अष्टविनायक गणेश मंडळातील सर्व सभासदांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे संचालन ताराचंद खोब्रागडे यांनी केले तर.आभार अशोक निरुडवार यांनी केले.