काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

1280

सावली तालुका महिला आघाडीच्या वतीने दिनांक 19/09/2023 रोज मंगळवारी रमाबाई आंबेडकर विद्यालय येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीला महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कविता गौरकर, महासचिव अल्काताई मोटघरे, जिल्हा प्रवक्ता उषाताई दुर्गे, निशाताई ठेंगरे, ज्येष्ठ सल्लागार ललिताताई गेडाम, सदस्या चंदाताई थुल या उपस्थित होत्या.


बैठकीदरम्यान काँग्रेसच्या महिला जेष्ठ कार्यकर्त्या भावनाताई बोरकर व बोथली येथील माजी ग्रामपंचायत सदस्य उषाताई कोरेवार यांनी बाळासाहेबांच्या कार्यावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.

तालुक्यात वंचित बहुजन आघाडी मजबूत करण्याच्या उद्देशाने ग्राम कमिटी तयार करणे, बूथ कमेटी, तालुक्यातील प्रत्येक गावात वंचित बहुजन आघाडी च्या शाखा तयार करून पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणे या मुख्य बाबीवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी शहर जिल्हा संघटिका उल्का गेडाम, शहराध्यक्ष वेणू बोरकर, तालुका महासचिव विना गडकरी, जिल्हा महासचिव विलास माहोरकर, तालुका अध्यक्ष भास्कर आभारे, ज्येष्ठ सल्लागार ए. आर. दुधे, के. एन. बोरकर, शहराध्यक्ष रोशन बोरकर, अरुणा सोमकुवर, मनोरमा गेडाम, राणी मोटघरे, ज्योती चुनारकर, चंदा बांबोडे चंद्रभागा गेडाम, अंजिरा रामटेके, शालू रामटेके, मीनाक्षी दुधे, ममता दुधे, बबीता दुधे, मनीषा घडसे, वैशाली गेडाम, प्रभा मेश्राम, कांता मेश्राम, राजश्री रावडे, भारती देवगडे, उज्वला गोवर्धन, उज्वला मानकर, नंदा बारसागडे, आशा वाकडे, द्वारका मेश्राम आदी वंचित बहुजन महिला आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या.