गाईला वाचविताना पशुपालकाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू, #विरुर गावात हळहळ#

244

राजुरा(प्रतिनिधी)-
रेल्वे ट्रॅकवर आलेल्या स्वमालकीच्या गाईला हाकलीत असतानाच अचानक आलेल्या रेल्वेच्या वेगाचा अंदाज न आल्याने धडक बसल्याने रवींद्र कुलमेथे या पशुपालकाचा जागीच मृत्यू झाला ही घटना विरुर स्टेशन गावात घडली असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे
रवींद्र कुळमेथे हे गरीब शेतकरी विरुर येथील रहिवासी आहे काल दिनांक 15 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास गावालगत असलेल्या रेल्वे गेट समोरील ट्रॅकवर त्याचे मालकीची गाय आल्याने तिला हाकलीत होता दरम्यान अचानक त्याच ट्रॅकवर रेल्वे आली रेल्वेच्या वेगाचा अंदाज आला नाही आणि रेल्वेची जबर धडक त्यांना बसली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच विरुर पोलीस ,ग्रामस्थ धाव घेतली पोलिसांनी मृत्यूदेह शवविच्छेदन साठी राजुरा येथे पाठविण्यात आला
रवींद्र यांचा स्वभाव मनमिळाऊ ,मदतीसाठी धावून जाणारा,मृदुभाषी ,सर्वप्रिय असल्याने त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच स्थानिक पोलीस मित्र, ग्रामस्थ व मित्र परिवारानाही अश्रू आवरता आले नाही गावात हळहळ व्यक्त होत आहे