वनविभागाचे संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन विभाग डोईजड?

87

राजुरा(संतोष कुंदोजवार)-
वनक्षेत्रात होणारे अतिक्रमण तसेच क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यासोबत अवैध वृक्षतोड,शिकारी,उत्खनन प्रतिबंध करिता तात्काळ मदतीसाठी विशेष बाब म्हणून संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन हे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे परंतु या पथकाचे कार्यशून्य प्रतापामुळे वनविभागास डोईजड ठरले असून पांढरा हत्ती पोसण्याचा प्रकार सुरू आहे
मध्य चांदा वनविभागाच्या राजुरा उपविभागीय वनक्षेत्र अंतर्गत राजुरा ,विरुर,जिवती,वनसडी या वनपरिक्षेत्रात क्षेत्रीय वनकर्मचार्याना अतिक्रमण तथा वनसरक्षण कामात सहकार्य करण्यासाठी हे विशेष पथक तयार केले आहे या पथकात वनपरिक्षेत्र अधिकारी,वनपाल, तीन वनरक्षक,दोन वनमजुर असा मनुष्यबळ कर्मचारी नियुक्त आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र कार्यलय सुद्धा देण्यात आलेले आहे परंतु हे पथक केवळ कार्यालयातच बसून कामकाज करीत आहे कित्येकदा यापैकी कर्मचारी कार्यालयातही येत नाही शिवाय वनपरिक्षेत्रात वनगुन्हे किंवा वनगस्ती साठी सुद्धा या पथकाची कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने क्षेत्रीय कर्मचाऱ्यात नाराजी व्यक्त होत आहे
या पथकातील कर्मचार्यावर वन विभाग दरमहा लाखो रुपयांचा खर्च करीत असला तरी त्याचा फायदा होत नसल्याने डोईजड होत असून केवळ पांढरा हत्ती पोसण्याचा प्रकार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे