पोलीस दुरक्षेत्र हे मार्गदर्शनाचे केंद्र व्हावे-पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांचे प्रतिपादन

381

 

*व्याहाड खुर्द येथे पोलीस दुरक्षेत्राचे उदघाटन

सावली(तालुका प्रतिनिधी)
सावली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द येथील पोलीस दुरक्षेत्र हे नागरिकांच्या समस्यांचे समाधान होणारे केंद्र निर्माण झाले पाहिजे त्या दृष्टीने पोलीस विभाग काम करतील असे प्रतिपादन चंद्रपूर पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी केले.

गडचिरोली ते चंद्रपूर या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे.त्यामुळे वाहतुकीचे नियम पाडून नागरिकांनी स्वतः सुरक्षित प्रवास करावा आणि कुटुंबालाही सुरक्षित ठेवावे.

पोलीस बांधव हे नेहमी नागरिकांना सहकार्य करीत असतात. सणासुदीच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस वर्ग नेहमी सतर्क असतो. लोकशाही मार्गानेच संविधानानुसार पोलीस विभाग कार्य करीत आहे. या व्याहाड परिसरात मागील 2022 मध्ये अपघाताचे प्रमाण वाढले होते. ते कमी करण्यास आमचा विभाग यशस्वी झाला असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. जेणेकरून पोलिसांना आपले कर्तव्य बजावण्यास अडचण भासणार नाही. वाहतुकीचे नियम न पाडणाऱ्या कडून आम्ही दंडाची रक्कम वसूल करीत असतो ती रक्कम थेट शासनाच्या तिजोरीत जमा होते असे परदेशी यांनी उदघाटन प्रसंगी बोलले.तसेच या ठिकाणी दुरक्षेत्र सुरू करण्यासाठी येथील ठाणेदार आशिष बोरकर यांनी घेतलेली मेहनत ही खरंच वाखान्याजोगी आहे.प्रत्येक काम माझे आहे असे म्हणून त्यांनी हे काम यशस्वी केल्याबद्दल ठाणेदार बोरकर यांचे पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमात सावली पोलीस स्टेशन हद्दीतील उत्कृष्ट कामगिरी केलेले पोलीस पाटील, पोलीस शिपाई दिलीप मोहुर्ले, विजय कोटनाके तसेच शासनाला नेहमीच मदत करणारी सामाजिक संघटना आपदा ग्रुप यांना पोलीस अधीक्षक परदेशी यांच्याकडून प्रशस्तीपत्र गौरविण्यात आले.

कार्यक्रमाप्रसंगी मुल येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे,मुल पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुमित परतेकी, सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर,व्याहाड खुर्द चे सरपंच सुनिता उरकुडे, तसेच मूल उपविभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व ठाण्याचे ठाणेदार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक आशिष बोरकर यांनी केले. संचालन नवनीत कंदालवार यांनी तर आभार पीएसआय एकनाथ राठोड यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावली पोलीस ठाण्याचे पीएसआय शशिकांत चीचघरे, एकनाथ राठोड, पोलीस अमलदार दिलीप मोहुर्ले, विजय कोटनाके, मोहन दासरवार, धीरज पिदुरकर, दर्शन लाटकर, विशाल दुर्योधन, कंपलवार, महिला पोलीस शिपाई रोहिणी अमृतकर आदींनी प्रयत्न केले.

*ठाणेदाराचे कौतुकांचा वर्षाव*
सावली पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने येथील नागरिकांच्या मागणी लक्ष्यात देऊन सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी पोलीस विभागाच्या सहकार्याने तब्बल 15 वर्षांपासून बंद असलेली व्याहाड खुर्द येथील पोलीस दुरक्षेत्र पुनश्च सुरू केले.त्यांच्या या यशस्वी कार्याचे पोलीस अधीक्षक, पोलीस उपविभागीय अधिकारी तथा सर्वच राजकिय पक्षाचे नेते,कार्यकर्ते, पत्रकार, पोलीस पाटील,सामाजिक कार्यकर्ते व नागरीकांनी सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांचे भरभरून कौतुक केले.